पेट्रोल दराचा भडका आणि मापातही ‘पाप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:08 AM2018-01-24T00:08:17+5:302018-01-24T00:09:29+5:30

शहरामध्ये पेट्रोलपंपावर मापात पाप करून ग्राहकांची लूट करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, शिवाजीनगर येथील पंपावरील ‘मापातील लुटी’चा प्रकार मंगळवारी समोर आला. अर्धा लिटरमागे सुमारे १०० मिली पेट्रोल चक्क चोरी केले जात असल्याचे लक्षात आल्यावर संतप्त नागरिकांनी पंपावर गोंधळ घालून जवाहरनगर पोलीस ठाणे आणि पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.

Petrol price hike and 'sin' | पेट्रोल दराचा भडका आणि मापातही ‘पाप’

पेट्रोल दराचा भडका आणि मापातही ‘पाप’

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबाद येथील पंपाविरोधात तक्रार : अर्धा लिटरमागे १०० मिलीची चोरी; पोलिसांनी केला पंप बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरामध्ये पेट्रोलपंपावर मापात पाप करून ग्राहकांची लूट करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, शिवाजीनगर येथील पंपावरील ‘मापातील लुटी’चा प्रकार मंगळवारी समोर आला. अर्धा लिटरमागे सुमारे १०० मिली पेट्रोल चक्क चोरी केले जात असल्याचे लक्षात आल्यावर संतप्त नागरिकांनी पंपावर गोंधळ घालून जवाहरनगर पोलीस ठाणे आणि पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. पाणीमिश्रित पेट्रोलच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण उघडीस आल्याने लुटीचा हा गोरखधंदा कधी बंद होणार, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ही लूट उघडकीस आणणाºया नीरज शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांनी गारखेडा परिसरातील ‘बालाजी सर्व्हो सर्व्हिसेस’ या इंडियन आॅईल कंपनीच्या पंपावर पेट्रोल भरले. मात्र, मशीनवरील लिटर रिडिंग मीटरच्या आकड्यावरून काही तरी गडबड असल्याची त्यांना शंका आली. ‘मी जेव्हा पेट्रोल टाकले तेव्हा लिटर रिडिंग मीटरवरील आकडा शून्यावरून थेट १२ वर गेला आणि माझ्या नंतरच्या गाडीच्या वेळी मात्र तो शून्यावरून ६ वर गेला. असे कशामुळे झाले याबाबत पंपावरील कर्मचाºयाला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, असे नीरज म्हणाले.
त्यांची शंका बळावली. त्यांनी मापामध्ये मोजणी करण्याची मागणी केली. त्यावर कर्मचाºयांनी केवळ पाच लिटरपर्यंत मोजणी करता येते, असे सांगितले. तोपर्यंत तेथे उपस्थित इतर नागरिकांनीसुद्धा पंप कर्मचाºयांना जाब विचारण्यास सुरुवात केली. लोकांचा रोष पाहून कर्मचाºयांनी काचेचे माप आणून ग्राहकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. लोकांनी त्याला अर्धा लिटर पेट्रोल भरण्यास सांगितले आणि काय आश्चर्य!
काचेच्या त्या मापात प्रत्यक्षात केवळ ४०० मिली पेट्रोल पडले होते. अर्धा लिटरमागे १०० मिलीची चोरी होत असल्याचे लक्षात येताच लोकांचा संताप वाढला. त्यांनी पंपाच्या मालक आशा योगेश गायकवाड यांना संपर्क केला असता योगेश गायकवाड यांनी त्यांना ‘कोणाकडे जायचे ते जा,’ असे उद्धटपणाचे उत्तर दिले. पंपावर गोंधळ वाढल्याने जवाहरनगर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बी. जी. वेव्हळ तिथे पोहोचले. लोकांचा राग अनावर होत असल्याचे पाहून वेव्हळ यांनी पेट्रोलपंप बंद करण्याचे आदेश दिले आणि संतप्त नागरिकांना पंपाविरोधात रीतसर तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार नीरज शुक्ला, सचिन शहाणे, राजेंद्र माळी, मनोज मगरे, महादेव हिंगे, बलराज दाभाडे, स्वप्नील मंकावार, सुरेश पाठे, योगेश ठोंबरे, ओंकार सुरसे, वसंत शिंदे यांनी ठाण्यात आणि पुरवठा अधिकाºयांकडे तक्रार केली.

आठच महिन्यांत पेट्रोल
७२ वरून ८१ रुपयांवर
औरंगाबाद : पेट्रोल दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला मोठा चटका बसत असून, औरंगाबादमध्ये तर आता पेट्रोलने ८१ रुपयांपर्यंत मजल मारली आहे. शहरातील पेट्रोलच्या भावामध्ये गेल्या आठ महिन्यांत भरमसाठ वाढ झाली असून, एप्रिलपासून आकडेवारी पाहिली असता लक्षात येते की, शहरात पेट्रोल ७२ रुपयांवरून ८१ रुपयांपर्यंत गेले. एप्रिल ते कालपर्यंत पेट्रोल दरामध्ये ८.७६ रुपयांची वाढ झाली आहे.
सोबत दिलेल्या आलेखावरून हे स्पष्ट होते की, गेल्या सहा महिन्यांत आॅक्टोबर महिन्यातील दिवाळीचा कालावधी सोडल्यास पेट्रोल दर वरचेवर वाढतच आहेत. एक वर्षापूर्वी शहराता पेट्रोलचे दर ७२.४२ रुपये, सहा महिन्यांपूर्वी ७४.९ रुपये, तीन महिन्यांपूर्वी ७६.८ रुपये, एका महिन्यापूर्वी ७८.५५ रुपये दर होते. असाच चढता आलेख कायम राहिल्यास औरंगाबादकरांना आणखी मोठा फटका बसू शकतो.

Web Title: Petrol price hike and 'sin'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.