पैठण तालुक्यातील ‘तो’ बिबट्या पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:41 AM2018-05-05T00:41:24+5:302018-05-05T00:42:07+5:30

तालुक्याला व वन विभागाला हैराण करुन सोडलेल्या बिबट्याला शुक्रवारी रात्री आपेगावपासून ४ कि.मी. अंतरावरील खिर्डी गावानजीक पकडण्यात आले.

 Paithan talukas caught 'he' leopards | पैठण तालुक्यातील ‘तो’ बिबट्या पकडला

पैठण तालुक्यातील ‘तो’ बिबट्या पकडला

googlenewsNext

पैठण : तालुक्याला व वन विभागाला हैराण करुन सोडलेल्या बिबट्याला शुक्रवारी रात्री आपेगावपासून ४ कि.मी. अंतरावरील खिर्डी गावानजीक पकडण्यात आले. एका शेतातील विहिरीवरुन पाणी भरणाऱ्या महिलेवर या बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु महिलेने सतर्कता दाखवून हुलकावणी दिल्याने बिबट्या या प्रयत्नात विहिरीत पडला. औरंगाबाद व नगरच्या वन अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन रात्री ९ वाजता बिबट्याला बाज टाकून विहिरीबाहेर काढले व जेरबंद केले. दरम्यान, हा नर जातीचा बिबट्या असून मादी याच भागात असल्याची माहिती वन अधिकाºयांनी दिली.

Web Title:  Paithan talukas caught 'he' leopards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.