मराठवाड्याच्या प्रकल्पात फक्त ४.२५ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 11:03 PM2019-03-24T23:03:15+5:302019-03-24T23:04:12+5:30

मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा अतिशय भयावह जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील बहुतांश जलप्रकल्प तळाला गेले असून, काही प्रकल्प आटले आहेत. मोठ्या, मध्यम, लघु प्रकल्प बंधाऱ्यात फक्त ४.२५ टक्के इतका पाणीसाठा आहे. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न पावसाळ्यापर्यंत असणार आहे.

Only 4.25 percent water stock in the Marathwada project | मराठवाड्याच्या प्रकल्पात फक्त ४.२५ टक्के पाणीसाठा

मराठवाड्याच्या प्रकल्पात फक्त ४.२५ टक्के पाणीसाठा

googlenewsNext
ठळक मुद्देटँकरचा आकडा दोन हजारांच्या दिशेने : ३० लाख लोकांना टँकरचे पाणी, बंधारे आटले

औरंगाबाद : मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा अतिशय भयावह जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील बहुतांश जलप्रकल्प तळाला गेले असून, काही प्रकल्प आटले आहेत. मोठ्या, मध्यम, लघु प्रकल्प बंधाऱ्यात फक्त ४.२५ टक्के इतका पाणीसाठा आहे. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न पावसाळ्यापर्यंत असणार आहे.
विभागातील ११ मोठ्या प्रकल्पांत ३.९० टक्के, ७५ मध्यम प्रकल्पांत ५ टक्के तर ७४९ लघु प्रकल्पांत ५ टक्के पाणीसाठा आहे. १३ बंधाऱ्यांत १० टक्के तर उर्वरित इतर २४ बंधारे आटले आहेत. नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी विभागीय प्रशासन नियोजन करण्याचे प्रयत्न करीत आहे.
कधी नव्हे एवढे टँकर मार्च महिन्याच्या सुरुवातीला विभागात सुरू असून, १८४६ टँकरने आठ जिल्ह्यांतील सुमारे ३० लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो आहे. येणाºया आठ दिवसांत २ हजारांच्या आसपास टँकरचा आकडा जाईल, असा अंदाज सूत्रांनी वर्तविला. १ हजार ३६८ गावांत, ४८१ वाड्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई सध्या आहे.
विभागात सर्वाधिक पिण्याच्या पाण्याची टंचाई औरंगाबाद जिल्ह्यात आहे. १३ लाख नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरने पुरविले जात आहे. २०८६ हून अधिक विहिरी प्रशासनाने ताब्यात (अधिग्रहित) घेतल्या आहेत. बीड जिल्ह्यात ७ लाख नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ७०० विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. त्यानंतर जालना जिल्ह्यातील ५ लाख नागरिकांना टँकरचे पाणी दिले जात आहे. ४०० विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. सध्या १८०० टँकर खाजगी कंत्राटदार संस्थांचे आहेत. मोठ्या प्रमाणात टँकर लॉबीवर प्रशासनाला अवलंबून राहावे लागत आहे. परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत टँकरची संख्या कमी असली तरी आगामी काळात ती वाढण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील प्रकल्पांची स्थिती
प्रकल्प संख्या पाणीसाठा
मोठे ११ ३.९० टक्के
मध्यम ७५ ५ टक्के
लघु ७४९ ५ टक्के
बंधारे १३ १० टक्के
इ.बंधारे २४ ००.०० टक्के
--------------------------
एकूण ८७२ ४.२५ टक्के ------------------

Web Title: Only 4.25 percent water stock in the Marathwada project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.