दैठणा : परभणी-गंगाखेड रस्त्यावरील ताडपांगरी शिवारात दुचाकी ट्रकवर आदळून एक जण ठार झाल्याची घटना २८ आॅगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.
परभणी-गंगाखेड रस्त्यावरील ताडपांगरी शिवारात ट्रक क्रमांक (एम.एच.२९-८०३५) हा रात्री मध्य रस्त्यावर उभा होता. त्यावेळी शिवाजी व्यंकटराव लांडे (वय ४५ रा. शिरपूर ता. पालम) हे दुचाकी क्रमांक (एम.एच.२२-एल.६९१३) ने जात होते. परंतु ट्रकचे इंडिकेटर चालू नसल्यामुळे शिवाजी यांना ट्रक दिसला नाही. त्यामुळे दुचाकी ट्रकवर जावून जोराने आदळली. ही घटना २८ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये शिवाजी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात आणत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. याप्रकरणी दैठणा पोलिस ठाण्यात स्वाती शिवाजी लांडे यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास दैठणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर तरोने हे करीत आहेत. (वार्ताहर)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.