औरंगाबादमध्ये घराला आग; 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 12:13 PM2019-01-19T12:13:32+5:302019-01-19T12:38:36+5:30

करमाड जवळील शेवगा येथे शुक्रवारी सायंकाळी घराला लागलेल्या आगीत संपूर्ण परिवार होरपळलं आहे. या आगीत 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी आहेत. 

one dead in massive fire breaks out in karmad aurangabad | औरंगाबादमध्ये घराला आग; 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी

औरंगाबादमध्ये घराला आग; 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देकरमाड जवळील शेवगा येथे शुक्रवारी सायंकाळी घराला लागलेल्या आगीत संपूर्ण परिवार होरपळलं आहे.आगीत 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी आहेत. नूर मोहम्मद जावेद बेग (16 महिने) या चिमुकल्याचा आगीत मृत्यू झाला आहे. 

औरंगाबाद - तालुक्यातील करमाड जवळील शेवगा येथे शुक्रवारी सायंकाळी घराला लागलेल्या आगीत संपूर्ण परिवार होरपळलं आहे. या आगीत 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी आहेत. औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नूर मोहम्मद जावेद बेग (16 महिने) या चिमुकल्याचा आगीत मृत्यू झाला आहे. 

करमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शेवगा येथील जावेद बेग वाहेद बेग यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली. त्यामुळे घरातील लोक बाहेर पडताना होरपळे आहेत. या घटनेत जकिरा बी जावेद बेग (30), महेक जावेद बेग (8), यास्मिन राजू बेग (28 ), अनिस बेग राजु बेग( 12), अरमान बेग राजू बेग(10), सुहाना इलियास बेग(9), सुरय्या इलियास बेग( 32) अशी भाजलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या घटनेनंतर सर्वांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान नूर या चिमुकल्याचा पहाटे पावणे सहा वाजेच्या सुमारास अंत झाला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहीती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी शेवगा गावात धाव घेतली. 

Web Title: one dead in massive fire breaks out in karmad aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.