गटविकास अधिकाºयांवर अपसंपदेचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:33 AM2017-08-23T00:33:03+5:302017-08-23T00:33:03+5:30

मरी येथील बालविकास सेवा प्रकल्प योजना कार्यालयात बालविकास प्रकल्प अधिकारी पदावर कार्यरत असताना शांता अमृतराव सुरेवाड (अनमुलवार) यांना लाच स्विकारताना पकडण्यात आले होते़ याप्रकरणात उघड चौकशीनंतर भाग्यनगर पोलिस ठाण्यात शांत सुरेवाड व व्यंकट अनमुलवार यांच्या विरोधात अपसंपदेचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

Offshore crime against the District Development Officer | गटविकास अधिकाºयांवर अपसंपदेचा गुन्हा

गटविकास अधिकाºयांवर अपसंपदेचा गुन्हा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड:उमरी येथील बालविकास सेवा प्रकल्प योजना कार्यालयात बालविकास प्रकल्प अधिकारी पदावर कार्यरत असताना शांता अमृतराव सुरेवाड (अनमुलवार) यांना लाच स्विकारताना पकडण्यात आले होते़ याप्रकरणात उघड चौकशीनंतर भाग्यनगर पोलिस ठाण्यात शांत सुरेवाड व व्यंकट अनमुलवार यांच्या विरोधात अपसंपदेचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
शांता सुरेवाड या २०१४ मध्ये उमरी येथे बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होत्या़ एका प्रकरणात त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले होते़ त्यांच्याविरोधात ७ आॅगस्ट २०१४ रोजी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्यात आली़
या चौकशीत शांत सुरेवाड यांनी त्यांच्या २००० ते २०१४ या चार वर्षाच्या काळात मिळालेल्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत ६१ लाख ३ हजार ४९९ रुपये एवढी अपसंपदा (बेहिशोबी मालमत्ता) संपादीत केल्याचे निष्पन्न झाले़ ही बेहिशोबी मालमत्ता गोळा करण्यासाठी सुरेवाड यांचे पती व्यंकट मोगलाजी अनमुलवार यांनीही सक्रिय मदत केल्याचे तपासात पुढे आले़ त्यानंतर या प्रकरणी दोघांविरुद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
या प्रकरणात शांता सुरेवाड यांचे देगलूर येथील भाग्य निवास तसेच नांदेड येथील घराची, देगलूर हद्दीतील शेती व खानापूर येथील प्लॉटची झडती घेण्यात आली़ पोलिस अधीक्षक संजय लाठकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय कुलकर्णी, पोनि़दयानंद सरवदे, सिद्धार्थ माने, कपील शेळके, पोहेकॉ़सोनकांबळे, शेख, साजीद अली, शिवहार किडे, व्यंकट शिंदे, बोडके, सुरेश पांचाळ, अंकुश गाडेकर, आशा गायकवाड यांनी सहभाग घेतला़ या प्रकरणात भाग्यनगर पोलिस तपास करीत आहेत़

Web Title: Offshore crime against the District Development Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.