आता धर्मादाय संस्थांवर आयकर विभागाची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 10:42 PM2019-05-06T22:42:16+5:302019-05-06T22:42:47+5:30

धर्मादाय संस्थावर आयकराची अत्यंत करडी नजर असणार आहे, असे प्रतिपादन प्रधान मुख्य आयकर आयुक्त प्रमोदकुमार गुप्ता यांनी केले.

 Now look at the income tax department in charitable organizations | आता धर्मादाय संस्थांवर आयकर विभागाची करडी नजर

आता धर्मादाय संस्थांवर आयकर विभागाची करडी नजर

googlenewsNext

औरंगाबाद : सामाजिक क्षेत्रातील जी कामे सरकार करू शकत नाही, किंवा यासाठी सरकारची संसाधने अपुरी पडतात, अशी कामे धमार्दाय संस्थांनी करणे अपेक्षित आहे. परंतु आतापर्यंतचा अनुभव पाहता यात धमार्दाय संस्था मोठ्या प्रमाणावर अपयशी ठरले असून त्यामुळे यापुढील काळात धर्मादाय संस्थावर आयकराची अत्यंत करडी नजर असणार आहे, असे प्रतिपादन प्रधान मुख्य आयकर आयुक्त प्रमोदकुमार गुप्ता यांनी केले.


आयकर विभाग औरंगाबाद व सीए असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी आयोजित केलेल्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे येथील मुख्य आयकर आयुक्त सरदारसिंह मीना, औरंगाबादचे संयुक्त धर्मादाय आयुक्त न्या. श्रीकांत भोसले, अतिरिक्त आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे, औरंगाबाद सीए संघटनेचे अध्यक्ष रोहन आचलिया, गणेश भालेराव यांची उपस्थिती होती.

प्रमोदकुमार गुप्ता म्हणाले, केवळ औरंगाबाद विभागाने धर्मादाय संस्थांवर केलेल्या कारवायांमधून सुमारे १७० कोटी रुपयांचे करपात्र उत्पन्न शोधण्यात मागील वर्षात यश आले. त्यातून विभागाने तब्बल ६० कोटी रुपयांचा कर वसूल केला आणि ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. केवळ महाराष्ट्र मध्ये आठ लाख नोंदणीकृत धर्मादाय संस्था असूनदेखील केवळ काही हजार संस्था आयकर विवरणपत्र भरतात, ही चिंतेची बाब आहे. यासाठी आता कडक पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकट्या औरंगाबाद विभागात मागील वर्षात केलेल्या कारवाईमुळे सुमारे अडीच हजार संस्थांनी नवीन आयकर विवरणपत्र दाखल केली असून हे विभागाच्या मोठे यश आहेत, असेही ते म्हणाले. सीएसआर म्हणजे कॉपोर्रेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याअंतर्गत दाखवण्यात येणाऱ्या देणग्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून त्यात कंपन्या व धमार्दाय संस्थांचा हात आहे. याबाबतीतही आयकर विभाग पुढील वर्षात कडक उपाययोजना व कारवाई करनार असल्याचे संकेत त्यांनी दिले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीपकुमार साळुंखे यांनी केले. याप्रसंगी त्यांनी सांगितले, चांगल्या संस्थांना मदत व नफेखोरी करणाºया संस्थांवर कारवाई, असे आयकराचे दुहेरी धोरण असून त्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट व इतरांनी विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सरदारसिंह मीना यांनी धमार्दाय संस्थांच्या कलम १२ अ कलम ८० जी याबाबतीत येणा-या समस्यांचा ऊहापोह केला. धमार्दाय संस्थांच्या प्रतिनिधींना वारंवार त्यासाठी पुण्याला येऊ लागू नये, म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी ते यासाठी खास शिबिर घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीकांत भोसले म्हणाले, धमार्दाय संस्था विशेषत: इस्पितळे यांनी गोरगरिबांसाठी खरोखर कार्य करावे, यासाठी कायद्याची सक्त अंमलबजावणी त्यांचे संचालनालय करीत आहे. अनेकदा आठवण देऊनही विवरणपत्र न भरणाºया हजारो संस्थांची नोंदणी रद्द केली.


रोहन अचलिया म्हणाले, मागील तीन वर्षात काळा पैसा बाहेर काढण्यासाठी व आयकर विवरणपत्र दाखल करणाºया संस्थांची संख्या वाढवण्यासाठी आयकर विभागाने केलेल्या सर्व प्रयत्नांना व राबवलेल्या सर्व मोहिमांना सीए असोसिएशन मदत केलेली आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून औरंगाबाद विभागात आयकर विभागाला फार मोठे यश मिळाले आहे. गणेश भालेराव यांनी आभार मानले.

Web Title:  Now look at the income tax department in charitable organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.