मागासवर्गीय उद्योजकांच्या उलाढालीची नाही माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:57 PM2018-02-14T23:57:47+5:302018-02-14T23:57:53+5:30

एससी, एसटी उद्योजक आणि त्यांनी केलेल्या गुंतवणुकीसह राज्यात किती उलाढाल होत आहे, याची कुठलीही माहिती नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या अधिका-यांकडे नसल्याचे बुधवारी समोर आले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा राज्यातील किती मागासवर्गीय उद्योजकांना लाभ झाला आहे, हे विभागीय अधिकारी पी. कृष्णमोहन व इतर अधिकाºयांना सांगता आले नाही.

No information about the turnover of the backward class entrepreneurs | मागासवर्गीय उद्योजकांच्या उलाढालीची नाही माहिती

मागासवर्गीय उद्योजकांच्या उलाढालीची नाही माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देनॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन : राष्ट्रीय एससी, एसटी हबतर्फे उद्योग मेळावा औरंगाबादेत

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एससी, एसटी उद्योजक आणि त्यांनी केलेल्या गुंतवणुकीसह राज्यात किती उलाढाल होत आहे, याची कुठलीही माहिती नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या अधिका-यांकडे नसल्याचे बुधवारी समोर आले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा राज्यातील किती मागासवर्गीय उद्योजकांना लाभ झाला आहे, हे विभागीय अधिकारी पी. कृष्णमोहन व इतर अधिकाºयांना सांगता आले नाही.
एनएसआयसी या कार्यालयाच्या माध्यमातून २०१५ नंतर किती मागासवर्गीय उद्योजकांना शासकीय योजनेचा फायदा झाला, किती व्यवसाय मागासवर्गीय उद्योजकांना मिळाले.
किती आर्थिक उलाढाल त्यांच्या गुंतवणुकीतून होत आहे, याची माहितीही उपलब्ध नसल्याचे सांगितले. राज्यात ३ उद्योग मेळावे घेऊन मागासवर्गीय उद्योजकांची माहिती संकलित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय अध्यादेशानुसार ४ टक्के माल खरेदी मागासवर्गीय उद्योजकांकडून करणे बंधनकारक आहे.
त्यातून राज्यातील किती उद्योजकांना व्यवसाय मिळाला, याची माहिती नसल्याचे अधिकाºयांना सांगता आले नाही.
१६ फेबु्रवारी रोजी औरंगाबादेत एससी., एसटी. उद्योग मेळाव्याची माहिती देण्यासाठी विभागीय अधिकारी पी. कृष्ण मोहन यांनी पत्रकार परिषदेत एससी., एसटी. उद्योजकांसाठी सरकारने लागू केलेल्या योजनांची माहिती देताना सांगितले, सरकारने २०१५ मध्ये आणलेल्या धोरणाच्या माध्यमातून निविदा प्रक्रियेनुसार ४ टक्के माल हा मागासवर्गीय उद्योजकांकडून खरेदी करणे बंधनकारक आहे. पण त्या उद्योजकांची नोंदच सरकार दरबारी नसल्याने आतापर्यंत त्यांना या तरतुदीचा फायदा झालेला नाही. सरकारी, निमसरकारी यंत्रणा हा नियम पाळत नसल्याचा आरोप पी. कृष्णमोहन यांनी केला.
एकदिवसीय उद्योजक मेळावा
राष्ट्रीय एससी, एसटी हबची एकदिवसीय परिषद १६ फेबु्रवारी रोजी सिडकोतील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
देशात एमएसएमई मंत्रालयातर्फे एससी, एसटी हबची मागासवर्गीय घटकांतील उद्योजकांना सरकारी धोरणांची एकत्रितपणे माहिती देण्यासाठी, उद्योजकांची मोट बांधण्यासाठी औरंगाबादेत हा उद्योग मेळावा होत आहे. पत्रकार परिषदेला नॅशनल एससी, एसटी हबचे विभागीय अधिकारी पी. कृष्णमोहन, शाखा व्यवस्थापक आकाश अवस्थी, ‘बिमटा’ चे अध्यक्ष नंदकिशोर रत्नपारखी आदींची उपस्थिती होती.

Web Title: No information about the turnover of the backward class entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.