मनपा जमा करणार... जुने कपडे, भांडी, बेडशीट, चप्पला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:36 PM2019-04-29T23:36:42+5:302019-04-29T23:37:33+5:30

औरंगाबाद : महापालिका म्हटले तर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर तुंबलेल्या गटारी, अपुरा पाणीपुरवठा, बंद पथदिवे, खराब रस्ते असे चित्र डोळ्यासमोर उभे ...

NMC deposits ... old clothes, utensils, bedsheets, sandals ...! | मनपा जमा करणार... जुने कपडे, भांडी, बेडशीट, चप्पला...!

मनपा जमा करणार... जुने कपडे, भांडी, बेडशीट, चप्पला...!

googlenewsNext
ठळक मुद्देएक हात मदतीचा : गरजू नागरिकांना साहित्य देण्याचा उपक्रम


औरंगाबाद : महापालिका म्हटले तर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर तुंबलेल्या गटारी, अपुरा पाणीपुरवठा, बंद पथदिवे, खराब रस्ते असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा देण्याचे आद्य कर्तव्य महापालिकेवर आहे. या कामात सपशेल अपयशी ठरलेली महापालिका आता नागरिकांकडून जुने कपडे, भांडी, बेडशीट, चपला जमा करून गरजू नागरिकांना वाटप करणार आहे.
शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी शहरात ‘माणुसकीची भिंत’ या नावाने जुने कपडे, गृहोपयोगी वस्तू जमा करून गरजू नागरिकांना दिल्या आहेत. काही स्वंयसेवी संस्था १२ महिने २४ तास याच कामात मग्न आहेत. आता स्वयंसेवी संस्थांचे काम महापालिका करणार असेल तर महापालिकेचे आद्य कर्तव्य असलेली कामे कोण करणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक, मेअर फेलो यांच्या संकल्पनेतून शहरातील गरजवंतांसाठी महापालिकेने सामाजिक भावनेतून ‘एक हात मदतीचा’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. घरात अनेक वस्तू वापराविना पडून असतात. त्याकडे कोणी कधी पाहतही नाही. याच वस्तूंची अनेकांना गरजदेखील असते. जुने वापरण्यायोग्य असलेले कपडे, भांडी, बेडशीट, चपला यासह इतर साहित्य महापालिकेतर्फे जमा केले जाणार असून, नंतर ते गरजूंना वाटप केले जाणार आहे.
उपक्रम राबविण्यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी काही दिवसांपूर्वी बैठक आयोजित केली होती. यावेळी महापालिका अधिकारी व मेअर्स फेलो यांनी ही योजना सुरू करण्याची सूचना केली होती. या उपक्रमाची जबाबदारी आयुक्तांनी मेअर्स फेलो अशिता गडप्पा, राजेश जाधव, दीपा इंचेकर यांच्यासह उपायुक्त मंजूषा मुथा यांच्यावर सोपविली आहे.
१ मेपासून सुरुवात
महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या वापरायोग्य जुन्या वस्तू १ ते ८ मेदरम्यान मुख्यालयातील इमारतीमध्ये सुरक्षा विभागाजवळ उभारण्यात आलेल्या मंडपात आणून द्याव्यात. कामगारदिनी १ मेला मंडप सुरू होईल. त्यानंतर भांडी, बेडशीट, चादर, कपडे, चपला यासह इतर वस्तू वेगवेगळ्या करून गरजूंना वाटप करण्यात येणार आहेत.

Web Title: NMC deposits ... old clothes, utensils, bedsheets, sandals ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.