शेंद्र एमआयडीसीत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:17 PM2019-03-10T23:17:13+5:302019-03-10T23:17:27+5:30

शेंद्रा एमआयडीसीत शापुरजी पालोनजीच्या वतीने शनिवारी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचा समारोप करण्यात आला. कामगारांच्या सुरक्षेसाठी कंपनीच्या वतीने विविध देखावे तयार करून कशा पद्धतीने सुरक्षेची काळजी घ्यावी याचे प्रात्यक्षिक दाखण्यात आले.

 The National Security Week concludes at the Shendra MIDC | शेंद्र एमआयडीसीत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचा समारोप

शेंद्र एमआयडीसीत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचा समारोप

googlenewsNext

शेंद्रा : शेंद्रा एमआयडीसीत शापुरजी पालोनजीच्या वतीने शनिवारी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचा समारोप करण्यात आला. कामगारांच्या सुरक्षेसाठी कंपनीच्या वतीने विविध देखावे तयार करून कशा पद्धतीने सुरक्षेची काळजी घ्यावी याचे प्रात्यक्षिक दाखण्यात आले. कार्यक्रमास कंपनीचे अधिकारी व शेकडो कामगारांची उपस्थिती होती.


शापुरजी पालोनजी अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शनच्या वतीने आयोजित कार्यक्रमास राष्ट्रगीत व सुरक्षेची शपथ घेत सुरुवात करण्यात आली. शेकडो कामगारांच्या उपस्थितीत पारपडलेल्या यावेळी सुरक्षेच्या दृष्टिने कामगारांना वापरात येणारे कपडे, बूट, हेल्मेट, हॅण्डग्लोज अशा विविध वस्तूसोबत अनेक सुरक्षा उपकरणे व त्यांचे उपयोग व फायदे कशा प्रकारे होते हे कामगारांना समजावून सांगण्यात आले.
यावेळी कंपनीच्या वतीने लाडगावच्या जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करून त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी लाडगावचे माजी सरपंच भाऊसाहेब घाडगे, शापुरजी पालोनजी कंपनीचे सुरक्षा व्यवस्थापक आर.के.सिंग, व्यवस्थापक वसीम शेख, अरुण चव्हाण, इम्रान, गुप्ता, देखमुख, पाटनी, रणजित, अप्पासाहेब मते, मंगेश बागल आदी उपस्थित होते.

Web Title:  The National Security Week concludes at the Shendra MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.