नासा’ मंगळावर दोन, तर गुरू ग्रहावर एक यान पाठवणार; नासेर चाहत यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 07:59 PM2017-12-20T19:59:59+5:302017-12-20T20:00:20+5:30

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘नासा’ येत्या काही दिवसात मंगळ ग्रहावर दोन तर गुरूवर एक यान पाठवणार आहे. याची तयारी पूर्ण होत आहे. ही यान अत्याधुनिक पद्धतींचा वापर करुन तयार केली असून, यानांच्या माध्यमातून दोन्ही ग्रहांवरील नविन माहिती समोर येईल, अशी माहिती ‘नासा’चे वरिष्ठ अँटेना व मायक्रोवेव्ह शास्त्रज्ञ डॉ. नासेर चाहत यांनी बुधवारी दिली.

NASA 'two on Mars, while a guru will send a vehicle to the planet; Nasser Savat gave information | नासा’ मंगळावर दोन, तर गुरू ग्रहावर एक यान पाठवणार; नासेर चाहत यांनी दिली माहिती 

नासा’ मंगळावर दोन, तर गुरू ग्रहावर एक यान पाठवणार; नासेर चाहत यांनी दिली माहिती 

googlenewsNext

औरंगाबाद : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘नासा’ येत्या काही दिवसात मंगळ ग्रहावर दोन तर गुरूवर एक यान पाठवणार आहे. याची तयारी पूर्ण होत आहे. ही यान अत्याधुनिक पद्धतींचा वापर करुन तयार केली असून, यानांच्या माध्यमातून दोन्ही ग्रहांवरील नविन माहिती समोर येईल, अशी माहिती ‘नासा’चे वरिष्ठ अँटेना व मायक्रोवेव्ह शास्त्रज्ञ डॉ. नासेर चाहत यांनी बुधवारी दिली.

औरंगाबादेतील एमआयटी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे कोलकाता येथील चॅप्टर आॅफ आयईईई, मुंबई येथील आयईईई बॉम्बे सेक्शन आणि नागपूर येथील प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने ६ व्या ‘अप्लाईड इलेक्ट्रोमॅग्नेटिक-२०१७’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे केले आहे. या परिषदेचे उदघाटन अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ.  राज मित्रा यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी  एमआयटीचे महासंचालक मुनिष शर्मा होते. यावेळी मंचावर पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट आॅफ अडव्हॉन्सड टेक्नॉलॉजीचे कुलगुरू डॉ. सुरेंद्र पाल, अमेरिकेतील कॅलिर्फोनिया विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. सतीश शर्मा,  कोलकाता विद्यापीठातील डॉ. देबातोश गुहा, शास्त्रज्ञ डॉ. सत्यजीत चक्रवर्ती आणि आयोजक डॉ. अभिलाषा मिश्रा उपस्थित होत्या.

उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात डॉ. राज मित्रा यांनी ‘भविष्यातील मेटा अटॉम्स आणि मेटा सरफेस बिल्डिंग ब्लॉक अँटेना’ या विषयावर बिजभाषण केले. यात त्यांनी अँटेनासाठी लागणारे धातू, विद्युत अवरोध यावर सखोल चिंतन केले. दुसºया सत्रात डॉ. नासेर चाहत यांनी ‘रिफ्लेक्ट अ‍ॅरे अ‍ॅण्ड रिफ्लेक्टर अँटेना’ या विषयावर संशोधन पेपर सादर केला. यात  त्यांनी ‘नासा’त मंगळ आणि गुरू ग्रहाच्या नविन मोहिमेसाठी जोरदार तयारी सुरु असल्याचे सांगितले. येत्या काही दिवसातच ‘नासा’ मंगळ ग्रहावर मार्को, मार्स क्यूब वन हे यान सोडणार आहे. त्यात २० बाय ३० सेमी चा आॅटोमॅटिक अँटेना बसविण्यात आला आहे. या अँटेनामध्ये रिफ्लेक्टर आणि सब रिफ्लेक्टर यांची संरचना आहे.

याशिवाय मार्स हेलिकॉप्टर पाठविण्याची तयारी सुरू आहे. या हेलिकॉप्टवरील अँटेनाची साईझ १० बाय १० बाय १० बाय सेमीे असून, वजन २ ग्रँमपेक्षा ही कमी ठेवण्याचे आव्हान ‘नासा’च्या शास्त्रज्ञांनी स्विकारले आहे.  यशिवाय ‘नासा’ युरोपा लँडर नावाचे यान गुरू ग्रहावरिल वातवरणाचा, प्रकृतीचा अभ्यास करण्यासाठी पाठवत आसल्याचेही डॉ. चाहत यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय समारोपात प्रा. मुनिष शर्मा म्हणाले, औरंगाबाद शहरात इलेक्ट्रॉनिक सिस्टिम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंंग सेक्टर मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे.  या क्षेत्राचा अधिक गतीने विकास होण्यासाठी अशा परिषदांची गरज असल्याचे सांगितले.

परिषदेच्या कार्यवाहक डॉ. अभिलाषा मिश्रा यांनी तीन दिवसात होणा-या विचार मंथनावर प्रकाश टाकला. तसेच या परिषदेसाठी जगभरातून २१८ शोधनिबंध आले होते. मात्र त्यातील १३१ शोधनिबंध निवडण्यात आल्याचे सांगितले. यावेळी डॉ. देबातोश गुहा यांनी आगामी ७ वी परिषद हौदराबाद येथे होणार असल्याची घोषणा केली. या परिषदेला एमआयटीचे अध्यक्ष डॉ. यज्ञविर कवडे, एमआयटीचे प्राचार्य डॉ. संतोष भोसले, डॉ. उल्हास शिंदे , डॉ. उल्हास शिऊरकर, विभागप्रमुख डॉ. गणेश साबळे आदी उपस्थित होते. परिषदेच्या यशस्वीतेसाठी इलेकट्रोनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन विभागातील प्राध्यापक, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.  

पहिल्या दिवशी तांत्रिक सेमिनार 
परिषदेच्या उदघाटनापुर्वी मंगळवारी तांत्रिक विषयावर सेमिनार घेण्यात आला. यात देश- विदेशातील शास्त्रज्ञांनी सहभागी होत अँटेनासाठी लागणाºया तांत्रिक बाबी म्हणजे हॉर्न आणि फीडवर प्रकाश टाकला. याशिवाय काही तज्ज्ञांनी अप्टीक फायबर याविषयी मांडणी केली असल्याचे डॉ. अभिलाषा मिश्रा यांनी सांगितले.

Web Title: NASA 'two on Mars, while a guru will send a vehicle to the planet; Nasser Savat gave information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.