नारेगाव कचरा डेपो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:10 AM2018-02-18T00:10:00+5:302018-02-18T00:10:07+5:30

नारेगाव कचरा डेपोच्या पायथ्याशी शेतकºयांनी शुक्रवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. मागील २४ तासांमध्ये कचºयाची एकही गाडी कचरा डेपोवर आंदोलकांनी येऊ दिली नाही. शनिवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी द्यावा, अशी नम्रपणे विनंती केली. आंदोलकांनी ही मागणीही फेटाळून लावली. आमच्या मागणीचा विचार करावा, असा प्रस्तावही जिल्हाधिकाºयांनी मांडला.

Naregaon garbage depot movement | नारेगाव कचरा डेपो आंदोलन

नारेगाव कचरा डेपो आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्दे‘त्रिमूर्ती’ची विनंतीही फेटाळली : जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांनी मागितली होती मुदतवाढ...

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नारेगाव कचरा डेपोच्या पायथ्याशी शेतकºयांनी शुक्रवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. मागील २४ तासांमध्ये कचºयाची एकही गाडी कचरा डेपोवर आंदोलकांनी येऊ दिली नाही. शनिवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी द्यावा, अशी नम्रपणे विनंती केली. आंदोलकांनी ही मागणीही फेटाळून लावली. आमच्या मागणीचा विचार करावा, असा प्रस्तावही जिल्हाधिकाºयांनी मांडला.
नारेगाव, मांडकी, गोपाळपूर आदी भागातील शेतकºयांनी एकत्र येऊन नारेगाव येथील जुना कचरा नष्ट करावा, नवीन कचरा येथे आणून टाकण्यात येऊ नये या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनाच्या दुसºया दिवशी सकाळीच महापौर नंदकुमार घोडेले, सभापती गजानन बारवाल, उपमहापौर विजय औताडे, माजी सभापती राजू शिंदे, सभागृहनेता विकास जैन यांनी आंदोलकांची भेट घेऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. त्यानंतर लगेचच आयुक्त डी.एम. मुगळीकर नारेगाव येथे पोहोचले. त्यांनी तब्बल एक तास आंदोलकांसोबत चर्चा केली. मागील तीन ते चार महिन्यांमध्ये कचºयावर प्रक्रिया करणे, नवीन यंत्र सामुग्री खरेदी करण्यासाठी विविध परवानग्या घेण्यात आल्या आहेत. ही सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आंदोलकांनी दोन महिन्यांचा अवधी दिल्यास हा परिसर नंदनवन होईल, असे नमूद केले.
या पाठोपाठ जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त यशस्वी यादव आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले. गावकºयांसोबत तब्बल २० मिनिटे चर्चा करण्यात आली. दीड महिन्यांची परवानगी द्यावी, अशी विनंती यादव यांनी केली. मनपा आयुक्त लेखी आश्वासन देतील, असेही त्यांनी सांगितले. गावकरी या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करीत असताना एक तथाकथित नेते तेथे पोहोचले. त्यांनी जोरदार भाषण ठोकून सकारात्मक चर्चेला वेगळे वळण दिले. त्यामुळे चर्चा निष्फळ ठरली. रविवारी परत आंदोलकांसोबत चर्चा करण्यात येणार असल्याचे महापौर घोडेले यांनी नमूद केले.
४० टक्के कचरा जिरविला
शुक्रवारी जमा केलेला कचरा मध्यवर्ती जकात नाक्यावर वाहनातच पडून आहे. आता या भागात दुर्गंधी सुटली आहे. रविवारपासून या भागात राहणाºया नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागेल. शनिवारी मनपाने ४० टक्के कचरा उचलला. हा कचरा विविध वॉर्डांमध्ये शोषखड्डे करून जिरवण्यात आला. उर्वरित ६० टक्के कचरा विविध वॉर्डांमध्ये पडून आहे. रविवारीही बहुतांश कचरा पडून राहणार आहे. सोमवारी शहरात कचरा प्रश्नावर मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तुमची बदली झाली तर...
जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त आज लेखी आश्वासन देतो असे नारेगावच्या आंदोलकांना सांगितले. येणाºया दोन महिन्यांत तुमच्या बदल्या झाल्या तर आम्ही काय करावे? या थेट प्रश्नावर तिन्ही अधिकारी निरुत्तर झाले. एकाचवेळी तिघांच्या बदल्या होणार नाहीत, असे जिल्हाधिकाºयांनी नमूद केले.
चिकलठाण्यात कचरा डेपोला विरोध
शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून नारेगावच्या शेतकºयांनी आंदोलन पुकारल्यानंतर महापालिकेने पैठण रोडवर बाभूळगाव येथे एका खाजगी कंपनीच्या जागेवर कचºयावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. २० ट्रक कचरा टाकल्यानंतर या डेपोला विरोध झाला. मनपाने त्वरित मिटमिट्यात सफारी पार्ककडे मोर्चा वळविला. येथेही तीच परिस्थिती होती.
शनिवारी सकाळी ७ वाजता चिकलठाण्यात मनपाच्या मालकीच्या जागेवर कचरा टाकण्याचा प्रयत्न झाला. यालाही गावकºयांकडून कडाडून विरोध झाला. जिथे तिथे विरोधाचे झेंडे दिसू लागल्याने मनपा प्रशासन आता मेटाकुटीला आले आहे.

Web Title: Naregaon garbage depot movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.