अपहरण झालेल्या त्या तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 09:01 PM2018-05-21T21:01:08+5:302018-05-21T21:01:39+5:30

दौलताबाद घाटातील मोमबत्ता तलावाजवळील विहिरीत रविवारी सापडलेला मृतदेह हिलाल कॉलनीतून अपहरण झालेल्या तरुणाचाच असल्याचे समोर आले.  

The murder of the kidnapped youth | अपहरण झालेल्या त्या तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न

अपहरण झालेल्या त्या तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न

googlenewsNext

औरंगाबाद: दौलताबाद घाटातील मोमबत्ता तलावाजवळील विहिरीत रविवारी सापडलेला मृतदेह हिलाल कॉलनीतून अपहरण झालेल्या तरुणाचाच असल्याचे समोर आले.  प्लॉटच्या वादातून अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. अनैतिक संबंधातून सुपारी देऊन ही हत्या करण्यात आल्याचे एका सहायक पोलीस आयुक्तांनी सांगितले. 

शेख जब्बार शेख गफ्फार(रा. हिलाल कॉलनी)असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अलीम उर्फ शे अलीमोद्दीन शेख मिनाजउद्दीन(४५,रा.हिलाल कॉलनी)आणि शेख इरफान उर्फ बाबा लोळी शेख करीम(२५,रा.असेफिया कॉलनी)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याप्रकरणातील मुख्य आरोपी बबला उर्फ शेख वाजेद, त्याचा भाऊ शेख अमजद आणि सिकंदर हे पसार असून त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. याविषयी बेगमपुरा पोलिसांनी सांगितले की, मृत शेख जब्बार हा प्लंबर होता. पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात आरोपी बबला उर्फ शेख वाजेद याच्याविरोधात यापूर्वी खूनाचे दोन गुन्हे नोंद आहेत. त्यानेच १६ मे रोजी जब्बारचे पांढऱ्या कारमधून अपहरण केले आणि त्याला अज्ञात ठिकाणी नेऊन अन्य साथीदारांच्या मदतीने त्याची हत्या केली. नंतर त्यांनी त्याचा मृतेदह दौलताबाद घाटातील मोमबत्ता तलावाजवळील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीत फेकला. 

मृताची ओळख पटू नये,यासाठी त्यांनी त्याचा चेहरा विद्रुप केला. त्याचे लिंग कापून टाकले आणि मृतदेह विहरीतून बाहेर येऊ नये, यासाठी मृताच्या पोटातील आतडी काढून पोटात आणि छातीत दगड-गोटे भरले आणि बेल्टने पोट बांधून ते विहिरीत टाकले. अत्यंत क्रुरपणे ही हत्या करण्यात आली. १६ मे रोजी जब्बार गायब झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी तो हरवल्याची तक्रार नोंदविली. त्याचे आरोपींनी अपहरण केल्याचे समजताच त्यांनी दुसऱ्या दिवशी अपहरणाची तक्रार नोंदविली. पोलिसांनी संशयित आरोपी अलीम आणि बाबा लोळी यांना पकडले. 

Web Title: The murder of the kidnapped youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.