औरंगाबादमध्ये प्लॉटिंगच्या वादातून हॉटेल व्यवसायिकाचा खून; पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 03:31 PM2017-12-28T15:31:50+5:302017-12-28T15:33:44+5:30

मित्रांसोबत गप्पा मारल्यानंतर दुचाकीने छावणीतील पेन्शनपुरा येथे घरी जाणार्‍या हॉटेल व्यवसायिकाचा लोखंडी रॉडने हल्ला करून खून करण्यात आले. ही घटना बुधवारी रात्री दिड वाजेच्या सुमारास छावणी आणि लक्ष्मी कॉलनीच्या सीमेवर असलेल्या अजिंठा भवन समोर झाली.

The murder of a businessman from plotting plots in Aurangabad; Filed Against Five Suspects | औरंगाबादमध्ये प्लॉटिंगच्या वादातून हॉटेल व्यवसायिकाचा खून; पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल 

औरंगाबादमध्ये प्लॉटिंगच्या वादातून हॉटेल व्यवसायिकाचा खून; पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल 

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांच्या रेकॉर्डनुसार मृताविरोधात गंभीर स्वरुपाचे चार वेगवेगळे गुन्हे दाखल आहे. पूर्व वैमन्यस्यातून अथवा प्लॉटिंगच्या वादातून हा खून झाला असावा,असा पोलिसांना संशय आहे. 

औरंगाबाद : मित्रांसोबत गप्पा मारल्यानंतर दुचाकीने छावणीतील पेन्शनपुरा येथे घरी जाणार्‍या हॉटेल व्यवसायिकाचा लोखंडी रॉडने हल्ला करून खून करण्यात आले. ही घटना बुधवारी रात्री दिड वाजेच्या सुमारास छावणी आणि लक्ष्मी कॉलनीच्या सीमेवर असलेल्या अजिंठा भवन समोर झाली.  पोलिसांच्या रेकॉर्डनुसार मृताविरोधात गंभीर स्वरुपाचे चार वेगवेगळे गुन्हे दाखल आहे.  पूर्व वैमन्यस्यातून अथवा प्लॉटिंगच्या वादातून हा खून झाला असावा,असा पोलिसांना संशय आहे. 

हुसेनखान अलियारखान उर्फ शेरखान(५५,रा.पेन्शनपुरा, छावणी)असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत शेरखान नावानेच ओळखला जात. मृत प्लॉटिंग आणि हॉटेल व्यवसायिक होता. रोज रात्री उशीरापर्यंत शहरातील मित्रांसोबत गप्पा मारणे, हॉटेलमध्ये थांबून ते घरी जात. बुधवारी रात्री १ .१५ वाजेच्या सुमारास मोतीकारंजा येथील मित्रांसोबत गप्पा मारल्यानंतर ते दुचाकीने एकटचे घरी निघाले. छावणी परिसरातील अजिंठा भवन समोरून ते जात असताना आधीच दबा धरून बसलेल्या मारेकर्‍यांनी अचानक त्यांच्यावर रॉडने  हल्ला चढविला.

या हल्लयात ते दुचाकीसह खाली कोसळले. यानंतर हल्लेखोरांनी आणखी दोन ते तीन वार केल्याने ते निपचित पडले. यानंतर आरोपी तेथून पसार झाले. सुमारे सव्वा दोन वाजेच्या सुमारास एका वाटसरूने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून दुचाकी अपघातात एक जण गंभीर जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा शेरखान हे बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले.शिवाय घटनास्थळी लोखंडी रॉड आढळला. यामुळे कोणीतरी त्यांच्यावर रॉडने हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. त्यांना बेशुद्धावस्थेत शेरखानला घाटीत दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी शेरखान यास तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी छावणी पोलीस स्टेशनमध्ये पाच संशियत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The murder of a businessman from plotting plots in Aurangabad; Filed Against Five Suspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.