हगणदारीमुक्त शहरासाठी पालिकेची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:04 AM2017-07-24T00:04:49+5:302017-07-24T00:10:50+5:30

जालना : शहर हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव पालिकेने घेतला आहे

Municipal corporation's challenge for a free city | हगणदारीमुक्त शहरासाठी पालिकेची धडपड

हगणदारीमुक्त शहरासाठी पालिकेची धडपड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहर हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव पालिकेने घेतला आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नागरिक आजही उघड्यावर शौचास जात आहेत. वैयक्तिक शौचालयांचे कामही अपूर्ण आहे. लवकरच राज्यस्तरीय पथक शहरात तपासणीसाठी येणार असल्याने पालिका प्रशासनाची धावपळ सुरू आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रत्येक शहर व गाव हगणदारीमुक्त करण्याचा शासनाचा निर्धार आहे. त्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. या अभियानात सहभाग घेतलेल्या जालना नगरपालिकेने शहर संपूर्ण हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव घेतला आहे. परंतु प्रत्यक्षात शहरातील स्थिती वेगळी आहे. २०१५-१६ मध्ये केलेल्या सर्वेनुसार पालिकेला तेरा हजार २०२ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट होते. पैकी पाच हजार २१० शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्याचा वापर सुरू आहे.
उर्वरित शौचालयांचे काम ७० टक्के काम पूर्ण झाल्याचे पालिका प्रशासन सांगत आहे. ज्या भागात नागरिक उघड्यावर शौचास जातात तिथे पालिकेने सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधली आहेत. उघड्यावर न बसता या स्वच्छतागृहांचा वापराच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी गुड मॉर्निंग पथकांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पथकाने नुकतीच शहरात येऊन तपासणी केली. आता लवकरच राज्य व केंद्र स्तरावरील पथक शहरात अचानक तपासणी करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून शौचालयाचा वापर करावा यासाठी प्रत्येक प्रभागात पथनाट्ये, पोस्टर, बॅनर व अन्य माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

Web Title: Municipal corporation's challenge for a free city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.