महावितरण, महसूल, वैद्यकीय प्रतिनिधी संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:00 AM2019-03-18T00:00:29+5:302019-03-18T00:01:36+5:30

एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह टी-२० क्रिकेट स्पर्धेत रविवारी महावितरण अ संघाने महसूल विभाग जालनावर २२ धावांनी, महसूल व वन विभागाने फोर्बस संघावर ४८ धावांनी, तर वैद्यकीय प्रतिनिधी अ संघाने महावितरण ब संघावर ९ धावांनी मात केली. सौरभ थोरातचे झंझावाती शतक हे आज झालेल्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. स्वप्नील चव्हाण आणि महेश जाधव हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.

MSEDCL, Revenue, Medical Representative team won | महावितरण, महसूल, वैद्यकीय प्रतिनिधी संघ विजयी

महावितरण, महसूल, वैद्यकीय प्रतिनिधी संघ विजयी

googlenewsNext
ठळक मुद्देसौरभ थोरातचे झुंजार शतक : स्वप्नील, महेश चमकले

औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह टी-२० क्रिकेट स्पर्धेत रविवारी महावितरण अ संघाने महसूल विभाग जालनावर २२ धावांनी, महसूल व वन विभागाने फोर्बस संघावर ४८ धावांनी, तर वैद्यकीय प्रतिनिधी अ संघाने महावितरण ब संघावर ९ धावांनी मात केली. सौरभ थोरातचे झंझावाती शतक हे आज झालेल्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. स्वप्नील चव्हाण आणि महेश जाधव हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.
पहिल्या सामन्यात महावितरण अ संघाने २० षटकांत ७ बाद १५२ धावा केल्या. त्यांच्याकडून स्वप्नील चव्हाणने ४१ चेंडूंत ३ षटकारांसह ६१, आदित्य राजहंसने २० व इनायत अलीने १९ धावा केल्या. महसूल विभाग जालनातर्फे विठ्ठल गाडेकरने २, तर विजय नवगिरे, राजीव नंदकर, आशिष सूर्यवंशी, ओमकार मांजरे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात जालना संघ ८ बाद १३० धावा करू शकला. त्यांच्याकडून ओमकार मांजरेने ३८ धावा केल्या. महावितरणकडून पवन सूर्यवंशीने ४० धावांत ४ गडी बाद केले. सय्यद इनायत अली, कैलास शेळके, स्वप्नील चव्हाण, राहुल शर्मा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात औरंगाबादच्या महसूल व विन विभागाने ६ बाद १९९ धावा केल्या. त्यांच्याकडून शेखर शिंदेने २ षटकार व ६ चौकारांसह ५५, मधुकर साळवेने २८ व लईक अन्सारीने २२ धावा केल्या. फोर्बसकडून कृष्णा राठोड व रोहित कुलकर्णी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात फोर्बसने २ बाद १५१ धावा केल्या त्यांच्याकडून सौरभ थोरातने ६६ चेंडूंतच ४ षटकार व १५ चौकारांसह १०५ धावांची झुंजार खेळी केली. नीलेश देवराजने १७ धावा केल्या. महसूल व वन विभागाकडून शेखर शिंदेने १ गडी बाद केला. तिसऱ्या सामन्यात वैद्यकीय प्रतिनिधी अ संघने ९ बाद १५१ धावा केल्या. त्यांच्याकडून महेश जाधवने ३ चौकारांसह ३४, अनिकेत जाधवने ३१, राहुल भालेरावने २६ व योगेश एडकेने २० धावा केल्या. महावितरण ब कडून संजय बनकरने २५ धावांत ६ गडी बाद केले. अनिकेत काळे, पांडुरंग धांडे व जोगिंदर तुसमकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात महावितरण ब संघ २० षटकांत ९ बाद १४२ धावाच करू शकला. त्यांच्याकडून जोगिंदर तुसमकरने ५ चौकारांसह ५४, बाळासाहेब मगरने ३४ व पांडुरंग धांडेने २४ धावा केल्या. महावितरणकडून विनोद शाहूराजेने २५ धावांत ३ व सतीश गोरेने २ गडी बाद केले. अनिकेत जाधव, राहुल भालेराव, महेश जाधव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

Web Title: MSEDCL, Revenue, Medical Representative team won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.