मोटारसायकल रॅलीने शहर दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 12:15 AM2017-08-06T00:15:12+5:302017-08-06T00:15:12+5:30

मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी होणाºया राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून हिंगोलीत ५ आॅगस्ट रोजी दुपारी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. जिल्हाधिकाºयांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन रॅलीचा समारोप झाला.

The motorcycle rallied the city | मोटारसायकल रॅलीने शहर दणाणले

मोटारसायकल रॅलीने शहर दणाणले

googlenewsNext

हिंगोली : मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी होणाºया राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून हिंगोलीत ५ आॅगस्ट रोजी दुपारी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. जिल्हाधिकाºयांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन रॅलीचा समारोप झाला.
गतवर्षी नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे मराठा समाजातील भगिनीवर अत्याचार झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यात ५७ ठिकाणी मराठा क्रांती मोर्चे निघाले. प्रत्येक मोर्चात लाखोच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. अगदी शांततेत व शिस्तीत हे मोर्चे पार पडले. मात्र सरकारने अशा त्याकडे कानाडोळा करून मराठा समाजाला केवळ अश्वासनेच दिली. यामुळे मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची जनजागृती म्हणून ५ आॅगस्ट रोजी शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये तीच शिस्त आणि तोच उत्साह पहावयास मिळाला. रॅलीत सहभागी युवकांची संख्या लक्षणीय होती. शिवाय महिलाही मागे नसल्याचे दिसून आले.
या रॅलीत जोरदार घोषणाबाजीही झाली. यात ये रॅली तो झॉंकी है, मुंबई अभी बाकी है, आरक्षण आमच्या हक्काच़, नाही कुणाच्या बाप्पाच़, अशा घोषणा दिल्या. तर जय जिजाऊ... जय शिवराय असा जयजयकार करीत चलो मुंबईचा नारा देण्यात आला. ही रॅली सकाळी ११ वाजता हिंगोली शहरातील छत्रपती शिवरायांच्या नियोजित पुतळ्यापासून सुरू झाली. त्यांनतर रिसाला बाजार, अकोला बायपास, आदर्श कॉलेज, सरस्वती नगर, रिसाला बाजार, पोस्ट आॅफीस रोड, जवाहर रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधीध चौक, इंदिरा गांधी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय जाऊन धडकली. यावेळी मुंबई मोर्चाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. समाजातील पाच मुलींच्या वतीने जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी स्वीकारले. यावेळी मुलींनी थोडक्यात आपल्या मागण्या मांडल्या. निवेदनात म्हटले की, मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे, कोपर्डी घटनेतील आरोपीला फासावर चढवावे, तसेच शेतकºयांशी निगडित विविध मागण्याही निवेदनात आहेत. मराठा समाजांच्या भावनांचा उद्रेक होत असून उपरोक्त मागण्या तात्काळ मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशाराही निवेदनात दिला. रॅलीत समाज बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाला होते.

Web Title: The motorcycle rallied the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.