कॉपीसाठी मोबाइल स्नॅप; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:19 AM2017-11-21T00:19:49+5:302017-11-21T00:19:54+5:30

अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षातील ‘काँक्रीट टेक्नॉलॉजी’ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेची मोबाइल स्नॅपचा वापर करून हायटेक कॉपी पुरविणाºया रॅकेटचा पोलिसांनी सोमवारी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका तरुणीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांमध्ये एक विद्यार्थी आणि इतर दोन तरुणांचा समावेश आहे.

 Mobile snap for copy; The crime against the four | कॉपीसाठी मोबाइल स्नॅप; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

कॉपीसाठी मोबाइल स्नॅप; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षातील ‘काँक्रीट टेक्नॉलॉजी’ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेची मोबाइल स्नॅपचा वापर करून हायटेक कॉपी पुरविणाºया रॅकेटचा पोलिसांनी सोमवारी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका तरुणीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांमध्ये एक विद्यार्थी आणि इतर दोन तरुणांचा समावेश आहे.
बीड रस्त्यावरील भालगाव येथील शरदचंद्र पवार पॉलिटेक्निकल कॉलेजच्या समोरील रस्त्यावर हा प्रकार घडला. या प्रकरणी परीक्षा देणारा रवींद्र पवार (रा. तोलानाईक तांडा, औरंगाबाद तालुका) आणि हायटेक कॉप्या पुरविणारा अक्षय त्र्यंबक सरकटे (२२,रा. देवखेड ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) यांना पोलिसांनी अटक केली असून दिव्या सतीश गाजरे (२०, रा. गुलमोहर कॉलनी, एन-५) या तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या भीतीने आशिष जोगदंड नावाचा तरुण पसार झाला.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांगितले की, ९ नोव्हेंबरपासून या कॉलेजमध्ये परीक्षा सुरू आहेत. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कॉलेजच्या परिसरात कॉपी सुरू असल्याची माहिती मिळाली. परीक्षा केंद्राबाहेर एका कारमध्ये काहीजण पुस्तकाच्या चिठ्ठ्या फाडताना व त्या मोबाइलद्वारे परीक्षा कक्षातील विद्यार्थ्यांना पाठवीत असल्याचे चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या पथकाला दिसले. काही तरी गोंधळ आहे, असे समजून पथकातील पोहेकॉ टिमकीकर यांनी याबाबत वरिष्ठाला माहिती दिली. त्यावरून ताईतवाले, फौजदार सुधाकर चव्हाण, कटकुरी, थोटे, सुनील गोरे, दीपक इंगळे, संतोष टिमकीकर, नामदेव इजलकुंठे, महिला पोलीस छाया राठोड यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. तिथे कारमध्ये तिघेजण बसल्याचे दिसले. पोलिसांनी कारमध्ये बसलेल्या अक्षय सरकटे आणि दिव्या गाजरे यांना ताब्यात घेतले, तर जोगदंड पसार झाला. पकडलेल्या दोघांकडे पुस्तकातून काढलेल्या चिठ्ठ्या आढळल्या. यावेळी पोलिसांनी अक्षय सरकटे याच्या हातातील मोबाइल घेऊन पाहणी केली. त्याच्या मोबाइलमध्ये कॉलेजमध्ये चालू असलेल्या ‘काँक्रीट टेक्नॉलॉजी’ या पेपरचे काही फोटो (स्नॅप) काढलेले दिसले. परीक्षा केंद्रात बसलेल्या रवींद्रने त्याच्या पेपरचे काही स्नॅप व्हॉटस् अ‍ॅपद्वारे अक्षयकडे पाठविले होते. या स्नॅपनुसार प्रश्नांची उत्तरे कारमध्ये बसलेले तिघे पाठवत असल्याचे स्पष्ट झाले.
मुलीच्या हातात फाडलेल्या पुस्तकाच्या चिठ्ठ्या होत्या. त्या चिठ्ठ्या व स्नॅप तपासले असता त्या कॉपी असल्याचे निदर्शनात आले.
चिकलठाणा पोलीस व ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अक्षय सरकटे व परीक्षार्थी रवींद्र पवार यास अटक केली असून, अन्य दोघांचा शोध पोलीस घेत आहे.

Web Title:  Mobile snap for copy; The crime against the four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.