एमजीआर एस. एस. क्लब चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:34 AM2018-02-19T00:34:26+5:302018-02-19T00:34:37+5:30

एमजीआर एस. एस. क्लबने अंतिम सामन्यात युनायटेड सी. सी. संघावर १७ धावांनी मात करीत आमखास मैदानावर रविवारी झालेल्या एटीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत अंतिम फेरीतील सामनावीर म्हणून ३.१ षटकांत १0 धावांत ६ गडी बाद करणारा बासीत अली ठरला. सर्वोत्तम फलंदाज म्हणून युनायटेडचा असीफ खान आणि सर्वोत्तम गोलंदाजाचा मानकरी एमजीआरचा बासीत अली ठरला.

 MGR S S. Club Champion | एमजीआर एस. एस. क्लब चॅम्पियन

एमजीआर एस. एस. क्लब चॅम्पियन

googlenewsNext

औरंगाबाद : एमजीआर एस. एस. क्लबने अंतिम सामन्यात युनायटेड सी. सी. संघावर १७ धावांनी मात करीत आमखास मैदानावर रविवारी झालेल्या एटीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत अंतिम फेरीतील सामनावीर म्हणून ३.१ षटकांत १0 धावांत ६ गडी बाद करणारा बासीत अली ठरला. सर्वोत्तम फलंदाज म्हणून युनायटेडचा असीफ खान आणि सर्वोत्तम गोलंदाजाचा मानकरी एमजीआरचा बासीत अली ठरला.
अंतिम सामन्यात एमजीआर एस. एस. क्लबने १५.४ षटकांत सर्वबाद १४0 धावा केल्या. त्यांच्याकडून सय्यद असीफने २३ चेंडूंत ३0, खालेद कादरी याने १४ चेंडूंतच २५ धावा फटकावल्या. प्रत्युत्तरात युनायटेड सी. सी. संघ १४.१ षटकांत १२३ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून भास्कर चौधरीने २३ चेंडूंत ३३ आणि योगेश चौधरीने १0 चेंडूंत २३ धावा फटकावल्या. एमजीआर एस. एस. क्लबकडून बासीत अली याने १0 धावांत ६ गडी बाद केले. अंतिम सामन्यानंतर फ्याज खान, फिरोज खान, नासेर सिद्दीकी, अय्युब खान आणि अबुल हसन हाश्मी यांच्या उपस्थितीत विजेत्या व उपविजेत्या संघास बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

Web Title:  MGR S S. Club Champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.