राहुल शर्माच्या स्फोटक फलंदाजीने मसिआ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:53 PM2017-11-18T23:53:37+5:302017-11-18T23:54:22+5:30

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत राहुल शर्मा याच्या चौफेर टोलेबाजीच्या जोरावर मसिआ संघाने लिप फास्टनर संघावर ८ गडी राखून मात केली. दुसºया समान्यात स्कोडा संघाने विजय मेहेत्रे याच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर एनएचके संघावर ४ गडी राखून विजय मिळवला.

Messi won with explosive batting by Rahul Sharma | राहुल शर्माच्या स्फोटक फलंदाजीने मसिआ विजयी

राहुल शर्माच्या स्फोटक फलंदाजीने मसिआ विजयी

googlenewsNext
ठळक मुद्देविजय मेहेत्रेचे ४ बळी : इंद्रजित उढाणचे अर्धशतक

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत राहुल शर्मा याच्या चौफेर टोलेबाजीच्या जोरावर मसिआ संघाने लिप फास्टनर संघावर ८ गडी राखून मात केली. दुसºया समान्यात स्कोडा संघाने विजय मेहेत्रे याच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर एनएचके संघावर ४ गडी राखून विजय मिळवला.
सकाळच्या सत्रात मसिआ संघाविरुद्ध लिप फास्टनर संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १०० धावा केल्या. त्यांच्याकडून अनुभवी इंद्रजित उढाण याने ६५ चेंडूंत ८ चौकारांसह ६५ आणि राहुल पाटील याने ४३ चेंडूंत २९ धावा केल्या. मसिआ संघाकडून रोहन राठोड, रोहन मोरे व मधुर पटेल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात मसिआ संघाने विजयी लक्ष्य १४.२ षटकांत एकही फलंदाज न गमावता ११४ धावा करीत गाठले. त्यात राहुल शर्मा याने चौफेर टोलेबाजी करताना ५५ चेंडूंतच ११ खणखणीत चौकार आणि प्रेक्षणीय ४ षटकारांसह नाबाद ८५ धावा करीत विजयात निर्णायक योगदान दिले. त्याला साथ देणारा संदीप भंडारी २ चौकारांसह १६ धावांवर नाबाद राहिला.
दुसºया सामन्यात एनएचके संघ विजय मेहेत्रे याच्या सुरेख फिरकी गोलंदाजीसमोर १३.४ षटकांत ६० धावांत गारद झाला. एनएचके संघाकडून गौरव शिंदेने १४ व योगेश परदेशी याने १३ धावा केल्या. विजय मेहेत्रे याने ६ धावांत ४ गडी बाद केले. त्याला संदीप खोसरे याने २४ धावांत ३ व पवन कवाले याने ७ धावांत २ गडी बाद करीत साथ दिली. प्रत्युत्तरात स्कोडा संघाने विजयी लक्ष्य १०.४ षटकांत ६ फलंदाज गमावून पूर्ण केले. त्यांच्याकडून विकी निंबुरे याने नाबाद १२ व विजय मेहेत्रे याने १५ धावा केल्या.

Web Title: Messi won with explosive batting by Rahul Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.