लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 09:17 PM2019-01-17T21:17:09+5:302019-01-17T21:17:14+5:30

लिंगायत समाजाला ओबीसी आरक्षण आणि अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी लिंगायत संघर्ष समितीतर्फे शहरात सामूहिक संदेश आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेकडो समाजबांधवांनी मुख्यमंत्र्यांना मोबाईलवरून संदेश पाठविले.

Messages to the Chief Minister for minority status for minorities | लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना संदेश

लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना संदेश

googlenewsNext

औरंगाबाद : लिंगायत समाजाला ओबीसी आरक्षण आणि अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी लिंगायत संघर्ष समितीतर्फे शहरात सामूहिक संदेश आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेकडो समाजबांधवांनी मुख्यमंत्र्यांना मोबाईलवरून संदेश पाठविले.


लिंगायत धर्म मान्यता, लिंगायतांसह सर्व पोटजातींना आरक्षण, अल्पसंख्याक दर्जा या मागण्या सत्तेत आल्यानंतर तात्काळ पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन २०१४ मध्ये कराडच्या आंदोलनात देण्यात आले होते. मात्र, सत्तेत येऊन चार वर्षे सहा महीने उलटूनदेखील मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. यासंदर्भात संतप्त भावना व्यक्त करीत गुरुवारी शहरात लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने सकाळी ११ते १ वाजेदरम्यान कॅनॉट प्लेस येथे समाजबांधवांनी एकत्र येऊन मोबाईलद्वारे मुख्यमंत्र्यांना संदेश पाठवून भावना कळविल्या.

काकासाहेब कोयटे, सुनिल रूकारी, सरला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले . यावेळी ज्ञानेश्वरअप्पा खर्डे, भरत लकडे, शिवा खाडंखुळे, बसवराज निबुंरगे, भगवान तिळकरी, सुधीर हाजबे, राम दाभाडे, दत्ता हिंगमीरे,अमोल वाजगे, संतोष खर्डे, अक्षय घुले ,ऋषी लोखंडे, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर,वीरभद्र गादगे, देवीदास ऊंचे, राजेश कोठाळे, संजय गवंडर, बसवराज मोरंखडे, दीपक निबुंरगे, मीना पिसोळे आदींनी आंदोलनांत सहभाग नोंदविला. 

Web Title: Messages to the Chief Minister for minority status for minorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.