मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटी हज यात्रेकरूंना सेवा देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:17 AM2019-07-09T00:17:44+5:302019-07-09T00:19:04+5:30

मराठवाड्यातील हज यात्रेकरूंना दर्जेदार सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटी मागील तीन दशकांपासून काम करीत आहे. दरवर्षी राज्य हज कमिटी यात्रेकरूंना सेवा द्यावी म्हणून मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटीची नेमणूक करीत असते. यंदा हुज्जाज कमिटीला बाजूला ठेवून यात्रेकरूंना सोयी- सुविधा देण्याचा घाट काही राजकीय मंडळींनी रचला आहे. त्यामुळे यंदा आम्ही यात्रेकरूंना सेवा देण्यात असमर्थ असल्याचे कमिटीने नमूद केले आहे.

The Merkaz-e-Khidmat-e-Hujjaj Committee will not serve Haj pilgrims | मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटी हज यात्रेकरूंना सेवा देणार नाही

मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटी हज यात्रेकरूंना सेवा देणार नाही

googlenewsNext
ठळक मुद्देवाद उफाळला : जामा मशीद कमिटीने सोयी-सुविधांसाठी दिले नाहरकत प्रमाणपत्र

औरंगाबाद : मराठवाड्यातील हज यात्रेकरूंना दर्जेदार सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटी मागील तीन दशकांपासून काम करीत आहे. दरवर्षी राज्य हज कमिटी यात्रेकरूंना सेवा द्यावी म्हणून मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटीची नेमणूक करीत असते. यंदा हुज्जाज कमिटीला बाजूला ठेवून यात्रेकरूंना सोयी- सुविधा देण्याचा घाट काही राजकीय मंडळींनी रचला आहे. त्यामुळे यंदा आम्ही यात्रेकरूंना सेवा देण्यात असमर्थ असल्याचे कमिटीने नमूद केले आहे.
मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटीचे संस्थापक करीम पटेल यांनी मराठवाड्यात ही दर्जेदार सेवा सुरू केली. महाराष्टÑ हज कमिटीची स्थापनाही पटेल यांच्याच नेतृत्वाखाली झाली. मागील तीन दशकांमध्ये पटेल यांनी शासनाच्या राज्य हज कमिटीचे अध्यक्षपद स्वीकारले नाही. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यानंतर मौलाना नसीमोद्दीन मिफ्ताही यांच्या नेतृत्वाखाली कमिटीचे कामकाज सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे जामा मशीद येथे सर्व यात्रेकरूंच्या राहण्याची, कागदपत्र तपासण्याची सोय करावी असे आदेश केंद्रीय हज कमिटीने दिले. केंद्रीय हज कमिटीच्या निर्णयाला फाटा देण्याचे काम राज्य हज कमिटीने मागील काही दिवसांपासून सुरू केल्याचा आरोप मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटीचे पदाधिकारी करीत आहेत.
जामा मशीद येथील सोयी- सुविधांचे केंद्र जालना रोडवरील शिवनेरी लॉन येथे हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाने नियुक्त केलेल्या जिल्हा हज कमिटी यात्रेकरूंना सोयी- सुविधा देईल, असा दावा करण्यात येत आहे. वास्तविक पाहता मागील ३० वर्षांपासून काम करणाऱ्या मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटीच्या स्वयंसेवक, पदाधिकाऱ्यांना यात्रेकरूंना कशी सेवा द्यावी लागते हे माहीत आहे. आता ज्यांना हज यात्रेचा अनुभव नाही, ते कशी काय सुविधा देऊ शकतील असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यंदा राज्य हज कमिटीने मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटीला यात्रेकरूंना सेवा द्यावी असे कोणतेही लेखी पत्र दिलेले नाही. त्यामुळे रविवारी रात्री कमिटीच्या पदाधिकाºयांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीत यंदा मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटी काम करणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मराठवाड्यातील हजारो यात्रेकरूंना बराच त्रास सहन करावा लागणार आहे. रात्री उशिरा जामा मशीद कमिटीने यात्रेकरूंना सर्व सोयी-सुविधा देण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे निवेदन प्रसिद्धीस दिले.

Web Title: The Merkaz-e-Khidmat-e-Hujjaj Committee will not serve Haj pilgrims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.