सदस्या पतीचे ग्रा.पं.ला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:30 AM2018-07-11T01:30:19+5:302018-07-11T01:30:45+5:30

वाळूज ग्रामपंचायतीने दिलेल्या बचत गटाच्या जाहिरातीत नाव न टाकल्यामुळे नाराज झालेल्या महिला सदस्याच्या पतीने मंगळवारी सकाळी चक्क वाळूज कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढून मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले.

Member husband locked grampanchayat | सदस्या पतीचे ग्रा.पं.ला टाळे

सदस्या पतीचे ग्रा.पं.ला टाळे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीने दिलेल्या बचत गटाच्या जाहिरातीत नाव न टाकल्यामुळे नाराज झालेल्या महिला सदस्याच्या पतीने मंगळवारी सकाळी चक्क वाळूज कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढून मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. कामानिमित्त आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊन मनस्ताप सहन करावा लागला. वाळूज ग्रामपंचायतीत मानपान नाट्य रंगल्यामुळे नागरिकांची चांगलीच करमणूक होत आहे.
ग्रामपंचायतीचे कर्मचारी मंगळवारी सकाळी १०.३० वाजता कार्यालयात आले. त्यांच्यापाठोपाठ ग्रामपंचायत सदस्या सायराबी पटेल यांचे पती हाफीज पटेल देखील आले. त्यांनी वादावादी करीत कर्मचाºयांना बळजबरीने कार्यालयाबाहेर काढले. त्यानंतर हाफीज पटेल यांनी कार्यालयाच्या चॅनल गेटला कुलूप लावून तेथून निघून गेले. ते बराच वेळ आले नाहीत. या वेळेत विविध कामानिमित्त आलेले नागरिक समोरच्या मैदानात बसले होते. दुपारी २ वाजले तरी कार्यालय उघडलेच नसल्यामुळे नाराजी व्यक्त करून नागरिक घरी निघून गेले.
जाहिरातीत नाव न टाकल्यामुळे संताप
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सावित्रीबाई फुले लोक संचलित साधन केंद्र वाळूजची सर्वसाधारण सभा नुकतीच रांजणगाव येथे पार पडली होती. या केंद्राच्या माहिती पुस्तिकेत वाळूज व परिसरातील काही ग्रामपंचायतीच्या जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या होत्या. मात्र, वाळूज ग्रामपंचायतीच्या जाहिरातीत सदस्या सायराबी पटेल यांचे नाव टाकले नसल्यामुळे त्यांचे पतीराज हाफीज पटेल संतप्त झाले. त्यावरून त्यांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकल्याचे काही सदस्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
सरपंचाकडून सारवासारव
सरपंच सुभाष तुपे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी माहिती पुस्तिकेत सायराबी पटेल यांचे नाव वगळल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याची कबुली दिली आहे. ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एस. सी. लव्हाळे हे मंगळवारी रजेवर असून, सकाळी ग्रामपंचायतीचे कर्मचारी वसुलीसाठी गेले असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्याचे सांगत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Member husband locked grampanchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.