Masias, Dist. W., Johnson won the team | मसिआ, जि. प., जॉन्सन संघ विजयी
मसिआ, जि. प., जॉन्सन संघ विजयी

ठळक मुद्देटी २0 क्रिकेट स्पर्धा : मधुर, सचिन, अनिरुद्ध सामनावीर

औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक टी-२0 क्रिकेट स्पर्धेत मसिआने बीमटा संघावर ९ गडी, तर जि. प.ने इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्चर संघावर १२ धावांनी आणि जॉन्सनने बजाज आॅटोवर ३ गडी राखून मात केली. आज झालेल्या सामन्यात मधुर पटेल, सचिन लव्हेरा आणि अनिरुद्ध पुजारी सामनावीर ठरले.
पहिल्या सामन्यात बीमटाने ५ बाद १५५ धावा केल्या. त्यांच्याकडून कर्णधार नीलेश जाधवने ४३ चेंडूंत ६ षटकार व ५ चौकारांसह ८१ धावा केल्या. महेश दहीवरने २८ व प्रवीण नागरेने २५ धावा केल्या. मसिआकडून हितेश पटेलने २, तर रोहन मोरे, धर्मेंद्र पटेल, रोहन राठोड यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात मसिआने विजयी लक्ष्य १६ षटकांत १ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून मधुर पटेलने ३0 चेंडूंत ९ चौकार व एका षटकारासह नाबाद ६0 धावा केल्या. शेख मुकीमने २६ चेंडूंत २ षटकार व ७ चौकारांसह ५३ व संदीप भंडारीने ४ चौकारांसह नाबाद ३३ धावा केल्या.
दुसऱ्या सामन्यात जि.प.ने ७ बाद १८0 धावा ठोकल्या. त्यांच्याकडून सचिन लव्हेराने ३२ चेंडूंतच ३ षटकार व ६ चौकारांसह ५९ धावा केल्या. कर्णधार सय्यद आरिफने १८ चेंडूंत ३३, विजय अडलाकोंडाने २३ व अरुण लाडने २२ धावा केल्या. गणेश गोरक्षकने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्चरने १६८ धावा केल्या. त्यांच्याकडून अजय कावळेने ४४, रणजित राजपूतने ३७ व गणेश गोरक्षकने २६ धावा केल्या. जि.प.कडून विजय सोनवणेने ३ व भाऊसाहेब गर्जे व प्रदीप जाधव यांनी अनुक्रमे २ व १ गडी बाद केला. तिसऱ्या सामन्यात बजाज आॅटोने ९ बाद ११९ धावा केल्या. त्यांच्याकडून महेश पाडळकरने ४६, सागर तळेकरने १८ धावा केल्या. जॉन्सनकडून अक्षय चव्हाण, अनिरुद्ध पुजारी व नीरज एस. यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात जॉन्सन संघाने विजयी लक्ष्य ७ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून अनिरुद्ध पुजारीने ३६, नीश पुजारीने २७, योगेश केदारेने १७ धावा केल्या. बजाजकडून अक्षय आम्हाडे, अली बकोदा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.


Web Title: Masias, Dist. W., Johnson won the team
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.