मराठवाड्याच्या पाणी परिषदेत प्रशांत बंब, सतीश चव्हाण यांच्यात कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 09:38 PM2018-10-22T21:38:49+5:302018-10-22T21:40:30+5:30

जायकवाडी धरणाच्या म्हणजे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासंदर्भात सोमवारी झालेल्या समन्यायी पाणीवाटप परिषदेत आ. प्रशांत बंब आणि सतीश चव्हाण यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला.

The Marathwada Water Conferences include Prashant Bombay, Satish Chavan, Kalgitura | मराठवाड्याच्या पाणी परिषदेत प्रशांत बंब, सतीश चव्हाण यांच्यात कलगीतुरा

मराठवाड्याच्या पाणी परिषदेत प्रशांत बंब, सतीश चव्हाण यांच्यात कलगीतुरा

googlenewsNext
ठळक मुद्देराजकीय धुमश्चक्री : समन्यायी पाणीवाटप परिषदेत राजकीय फटकेबाजी


औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या म्हणजे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासंदर्भात सोमवारी झालेल्या समन्यायी पाणीवाटप परिषदेत आ. प्रशांत बंब आणि सतीश चव्हाण यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. बैठकीत नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांत अडविलेल्या पाण्याच्या गंभीर प्रश्नांवरील चर्चेबरोबर राजकीय धुमश्चक्री आणि राजकीय फटकेबाजी झाली.
आ. प्रशांत बंब यांनी प्रास्ताविकात जायकवाडीत नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून सध्या सोडाव्या लागणाऱ्या ११ टीएमसी पाण्यासह भविष्यात कराव्या लागणाºया प्रस्तावित जलयोजनांचा आढावा सादर केला. पश्चिम वाहिनी नद्यांतून मराठवाड्यासाठी पाणी आणणे, कृष्णा खोºयातून मराठवाड्याला २३.६६ टीएमसी पाणी कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकेल, मध्य व वैनगंगा, निम्न वैनगंगा या उपखोºयातील पाणी वळवून मराठवाड्यासाठी उपलब्ध करता येईल. मराठवाड्यात १५० टीएमसी पाण्याची तूट आहे. त्यामुळे अतिरिक्त पाण्याच्या ठिकाणाहून पाणी आणावे लागेल, अशी मांडणी त्यांनी केली. त्यांच्या प्रास्ताविकानंतर आ. सतीश चव्हाण हे मनोगत व्यक्त करण्यासाठी आले. मनोगत व्यक्त करताना त्यांनी सुरुवातीपासूनच आ. बंब यांनी मांडलेल्या आकडेवारीवर आक्षेप घेतला. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना पूर्वीच मंजूर आहे, त्याविषयी आ. बंब सांगत होते. प्रत्यक्षात योजनेला तोकडा निधी मिळत असल्याचे आ. चव्हाण यांनी नमूद केले. सध्या केवळ जायकवाडीच्या वरच्या धरणांतून पाणी सोडण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे, योजनांसाठी निधी मिळवून घेतला पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.
शरद पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठरविले तर पाणी
यावर आ. प्रशांत बंब यांनी पुन्हा माईकचा ताबा घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जर ठरविले तर एका दिवसात जायकवाडीत पाणी येईल, असा शब्दरुपी हल्ला केला. त्यामुळे आ. सतीश चव्हाण यांनी पुन्हा माईकचा ताबा घेतला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या भागासाठी आंदोलन करणे समर्थनीय आहे. शरद पवार हे बारामतीचे आहेत. त्यामुळे त्यांचा यात संबंध नाही. जलसंपदामंत्र्यांनी एक फोन केला तर पाणी सुटेल. केवळ राजकारणासाठी, मोठे होण्यासाठी मोठ्या व्यक्तींचे नाव घेऊ नये, असा टोला त्यांनी आ. बंब यांना लगावला. मनोगत व्यक्त केल्यानंतर आ.सतीश चव्हाण नाट्यगृहातून रवाना झाले.
नारायण कुचे यांनाही टोला
आ. सतीश चव्हाण यांनी मनोगतात आ. नारायण कुचे यांनाही टोला लगावला. आ. बंब आणि आ. चव्हाण यांच्यात सुरू असलेल्या शाद्बिक चकमकीदरम्यान आ. कुचे टाळ्या वाजत होते. तेव्हा तुम्ही अभ्यास केलेला आहे. तुम्हाला दाद द्यावीच लागेल, असे आ. चव्हाण म्हणाले. या कलगीतुºयानंतर संपूर्ण बैठकीचे स्वरूपच बदलून गेले. बैठकीला राजकीय स्वरूप आल्यानेच काहींनी न बोलण्यावर भर दिल्याची चर्चा बैठकीत सुरू होती.

Web Title: The Marathwada Water Conferences include Prashant Bombay, Satish Chavan, Kalgitura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.