चिकलठाण्यात मनपा बॅकफुटवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:36 PM2019-03-18T23:36:19+5:302019-03-18T23:36:48+5:30

चिकलठाण्यात अवघ्या चार महिन्यांमध्ये कचरा प्रक्रिया केंद्र सुरू होईल, असे खोटे आश्वासन देणाऱ्या मनपा प्रशासनाविरुद्ध या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेतकºयांनी कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत एकही कचºयाचे वाहन जाऊ दिले नाही.

Mana backfooter in chikatha! | चिकलठाण्यात मनपा बॅकफुटवर!

चिकलठाण्यात मनपा बॅकफुटवर!

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांचे आंदोलन : चौथ्या दिवशीही कचरा टाकण्यास विरोध

औरंगाबाद : चिकलठाण्यात अवघ्या चार महिन्यांमध्ये कचरा प्रक्रिया केंद्र सुरू होईल, असे खोटे आश्वासन देणाऱ्या मनपा प्रशासनाविरुद्ध या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेतकºयांनी कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत एकही कचºयाचे वाहन जाऊ दिले नाही. शेतकºयांच्या आंदोलनामुळे मागील चार दिवसांमध्ये मनपा चांगलीच बॅकफुटवर आली आहे. जुन्या हजारो मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया केल्याशिवाय नवीन कचरा येऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकºयांनी घेतली आहे.
नारेगाव येथील कचरा डेपोविरोधात परिसरातील ग्रामस्थांनी फेबु्रवारी २०१८ मध्ये जोरदार आंदोलन केल्यानंतर शहराचा कचरा प्रश्न राज्यभर गाजला. विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरताच राज्य शासनाने मनपाला तब्बल ९१ कोटींचा निधी मंजूर केला. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी चार ठिकाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. निविदा प्रक्रिया, कंत्राटदार निश्चित करणे, शेड उभारणी या कामांमध्ये वर्ष गेले. अद्याप कचºयावर प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव व कांचनवाडी या चार ठिकाणी तात्पुरते पत्र्याचे शेड उभारून त्यात कचरा साठविण्यात आला. नारेगावप्रमाणे मनपाने कचºयाचे मोठमोठे डोंगर तयार करून ठेवले आहेत. भविष्यात या कचºयावर कधी प्रक्रिया करण्यात येईल, हे सुद्धा मनपा ठामपणे सांगू शकत नाही.
चिकलठाणा पंचक्रोशीतील शेतकºयांनी कचरा प्रक्रिया प्रकल्प त्वरित उभारण्यात यावा या मागणीसाठी मनपाकडे पाठपुरावा केला. प्रत्येक वेळी प्रशासनातर्फे चार महिन्यांमध्ये प्रकल्प सुरू होईल, असे आश्वासन देण्यात आले. सहा महिने उलटले तरी प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही, त्यामुळे शेतकरी बाळासाहेब दहीहंडे, दिगंबर कावडे, रमेश नवपुते, कारभारी गोरे, संजय गोटे, दिगंबर कावडे, दिलीप रेठे यांच्यासह शेतकºयांनी शुक्रवारपासून कचरा टाकण्यास विरोध सुरू केला. जुन्या कचºयावर प्रक्रिया झाल्याशिवाय एकही नवीन वाहन आणायचे नाही, असा पवित्रा शेतकºयांनी घेतला आहे. सोमवारी चौथ्या दिवशीही शेतकºयांनी आंदोलन सुरूच ठेवले.

Web Title: Mana backfooter in chikatha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.