माकडाने आणले औरंगाबाद महानगरपालिकेला गोत्यात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:36 AM2018-06-02T00:36:51+5:302018-06-02T00:39:42+5:30

सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी २०१७ मध्ये अनधिकृतपणे एक काळ्या तोंडाचा माकड पकडून ठेवला. या माकडाला चक्क प्राणिसंग्रहालयाच्या पिंज-यात ठेवून वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग केला आहे.

Mamadan brought to Aurangabad municipal corporation ... | माकडाने आणले औरंगाबाद महानगरपालिकेला गोत्यात...

माकडाने आणले औरंगाबाद महानगरपालिकेला गोत्यात...

googlenewsNext
ठळक मुद्देझू अ‍ॅथॉरिटीसमोर : मनपा अधिकाऱ्याचे ‘आ बैल मुझे मार’; विनापरवानगी माकड पकडून ठेवले

मुजीब देवणीकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी २०१७ मध्ये अनधिकृतपणे एक काळ्या तोंडाचा माकड पकडून ठेवला. या माकडाला चक्क प्राणिसंग्रहालयाच्या पिंज-यात ठेवून वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग केला आहे. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश गुरुवारी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने राज्याच्या वन्यजीव विभागाच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. कारवाईचा अहवालही त्वरित पाठविण्यात यावा, असे आदेशात म्हटले आहे.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय महापालिकेला एकही प्राणी ठेवता येत नाही. २०१७ मध्ये सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात एक काळ्या तोंडाचा माकड आला. संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी चक्क या माकडाला पकडून पिंज-यात बंद केले. मागील महिन्यात केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने महापालिकेला नोटीस पाठवून प्राणिसंग्रहालय बंद का करण्यात येऊ नये, अशी नोटीस पाठविली आहे. या नोटीसनुसार २४ मे रोजी दिल्लीत प्राधिकरणाच्या समितीसमोर सुनावणी ठेवण्यात आली होती. सुनावणीत घेतलेल्या ३७ आक्षेपांवर महापालिकेला म्हणणे मांडायचे होते. सुनावणीस प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे उपस्थित होते. मास्टर प्लॅनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ३० कोटी रुपये लागणार आहेत. महापालिका हळूहळू युद्धपातळीवर कामे करणार असल्याचे नमूद केले. महापालिकेच्या कामकाजाच्या बढाया मारणेही त्यांनी सुरू केले. बोलण्याच्या ओघात नाईकवाडे यांनी आम्ही एक माकड पकडून ठेवला. त्याला एका पिंजºयात दररोज जेवण देतो. प्राण्यांची आम्ही खूप काळजी घेतो, असे सांगितले.
समितीने केले रेकॉर्ड
नाईकवाडे यांनी पकडलेल्या काळ्या तोंडाच्या माकडाची कथा केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने रेकॉर्डवर घेतली. त्यांना एक शब्दही प्रश्न विचारला नाही. नाईकवाडे औरंगाबादला परतल्यावर समितीचे सदस्य सचिव डॉ. डी. एन. सिंग यांनी चक्क महाराष्टÑ शासनाच्या वन्यजीव विभागाचे प्रधान सचिव यांना ३१ मे रोजी पत्र पाठविले.
या पत्रात औरंगाबाद महापालिकेने विनापरवानगी एक काळ्या तोंडाचा माकड पकडून ठेवला आहे. याची सखोल चौकशी करावी. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मधील कलम ५२, २(१६), ५१ नुसार कारवाई करण्यात यावी. या कारवाईचा सविस्तर अहवाल प्राधिकरणाला पाठवावा, असे नमूद केले आहे.
सलमान खान याला हरणाच्या शिकार प्रकरणात जे कलम लावण्यात आले होते तेवढेच गंभीर कलम डॉ. नाईकवाडे यांच्यावर लावा, असेही प्राधिकरणाने म्हटले आहे.

Web Title: Mamadan brought to Aurangabad municipal corporation ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.