ओबीसी समाजामध्ये जगजागृती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:04 AM2019-01-28T00:04:56+5:302019-01-28T00:05:24+5:30

आंबेडकरी चळवळीने थेट देवा-धर्माबाबत विरोधी भूमिका घेतल्यामुळे या चळवळीपासून ओबीसी समाज दूर गेला. या समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एक मिशन म्हणून ओबीसी समाजाच्या जनजागृतीचे काम करावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी आज येथे केले.

Make awareness in the OBC community | ओबीसी समाजामध्ये जगजागृती करावी

ओबीसी समाजामध्ये जगजागृती करावी

googlenewsNext
ठळक मुद्देगंगाधर बनबरे : डॉ. आंबेडकर नायक पुरस्कार वितरण समारंभ

औरंगाबाद : आंबेडकरी चळवळीने थेट देवा-धर्माबाबत विरोधी भूमिका घेतल्यामुळे या चळवळीपासून ओबीसी समाज दूर गेला. या समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एक मिशन म्हणून ओबीसी समाजाच्या जनजागृतीचे काम करावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी आज येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या मूळ पुस्तकावर आधारित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नायक- २०१९’ या राज्यस्तरीय वाचन, लेखन व वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी सायंकाळी संत तुकाराम नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, जीएसटीचे उपायुक्त रवी जोगदंड, आर. के. गायकवाड आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात होते.
यावेळी बनबरे आपल्या भाषणात म्हणाले, सर्वांनी अगोदर बाबासाहेबांनी लिहिलेले मूळ ग्रंथ वाचले पाहिजेत. बाबासाहेबांनी लिहिलेला ‘शूद्र पूर्वी कोण होते’ हा शिवाजी महाराजांसंबंधी धर्माची चिकित्सा करणारा ग्रंथ आहे. अलीकडे मराठा-दलित हे एकमेकांचे शत्रू आहेत, असे चित्र उभे केले जात आहे; परंतु राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, केळूस्कर गुरुजी यांचा आणि बाबासाहेबांचा संबंध दोन्ही समाजाने समजून घेतला पाहिजे. ओबीसी समाज आपल्यापासून का दुरावला, याचा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. थेट देवा-धर्माबद्दल टोकाची भूमिका न घेता मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने धर्म आणि मंदिराचा आपला संबंध आहे; पण बडव्यांना आमचा विरोध आहे, अशी भूमिका घेतली आहे.
वक्त्यांच्या भाषणानंतर विजेत्या स्पर्धकांना माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात वाचन, लेखन आणि वक्तृत्वाच्या आधारे सामाजिक परिवर्तन केले. त्यांचे अनुकरण आंबेडकरी समाजातील युवकांनीही करावे, स्पर्धेच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या साहित्य वाचनाची सवय लागावी म्हणून स्पर्धा घेण्यात आली होती. सात राज्यांतील २ हजार ७६५ जणांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६५१ युवकांची परीक्षेसाठी निवड केली होती. शंभर गुणांच्या या परीक्षेला ४०० जण बसले होते. नागपूर, पुणे, मुंबई आणि औरंगाबाद या चार विभागांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. लेखी परीक्षेत जास्तीत जास्त गुण घेणाऱ्या ४७ जणांची वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहात रविवारी दिवसभर ही स्पर्धा झाली. त्यानंतर विजेत्यांची निवड जाहीर केली.

Web Title: Make awareness in the OBC community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.