अ‍ॅस्ट्रो टर्फ, सिंथेटिक ट्रॅक, स्विमिंगपूलसाठी निधी उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:07 AM2018-06-30T01:07:17+5:302018-06-30T01:08:11+5:30

अ‍ॅस्ट्रो टर्फचे मैदान, अ‍ॅथलेटिक्सचे सिंथेटिक ट्रॅक आणि स्विमिंगपूल हे विभागीय क्रीडा संकुलात पूर्वनियोजित आहेत. तथापि, आर्थिक तरतुदीमुळे हे काम होऊ शकले नाही. त्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेने क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. याविषयीचे निवेदन औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, मकरंद जोशी, सचिव गोविंद शर्मा, प्रदीप खांड्रे, दिनेश वंजारे, संजय भूमकर, स्वप्नील तांगडे, भिकन आंबे, अजय त्रिभुवन आदींनी विशेष कार्यकारी अधिकारी कविता नावंदे यांना दिले आहे.

Make available funds for astro turf, synthetic track, swimming pool | अ‍ॅस्ट्रो टर्फ, सिंथेटिक ट्रॅक, स्विमिंगपूलसाठी निधी उपलब्ध करा

अ‍ॅस्ट्रो टर्फ, सिंथेटिक ट्रॅक, स्विमिंगपूलसाठी निधी उपलब्ध करा

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा आॅलिम्पिक संघटनेची क्रीडामंत्र्यांना मागणी

औरंगाबाद : अ‍ॅस्ट्रो टर्फचे मैदान, अ‍ॅथलेटिक्सचे सिंथेटिक ट्रॅक आणि स्विमिंगपूल हे विभागीय क्रीडा संकुलात पूर्वनियोजित आहेत. तथापि, आर्थिक तरतुदीमुळे हे काम होऊ शकले नाही. त्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेने क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.
याविषयीचे निवेदन औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, मकरंद जोशी, सचिव गोविंद शर्मा, प्रदीप खांड्रे, दिनेश वंजारे, संजय भूमकर, स्वप्नील तांगडे, भिकन आंबे, अजय त्रिभुवन आदींनी विशेष कार्यकारी अधिकारी कविता नावंदे यांना दिले आहे. या लेखी निवेदनात आॅलिम्पिक संघटनेने अ‍ॅस्ट्रो टर्फ, सिंथेटिक ट्रॅक आणि स्विमिंगपूलच्या निमिर्तीसाठी निधी द्यावा, तसेच क्रीडा संकुलातील रिकाम्या असणाऱ्या खोल्या या प्रशिक्षण व खेळाडू घडवण्यासाठी क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा संघटनांना माफक दरात द्यावे, अशा मागण्या केल्या आहेत. तसेच पावसाळ्यात इनडोअर हॉलच्या छतातून पावसाचे पाणी येते. ते तातडीने दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

नावंदे म्हणतात... अ‍ॅस्ट्रो टर्फ होणार नाही
शासनाच्या विशेष कार्य अधिकारी कविता नावंदे यांनी औरंगाबादेतील अ‍ॅस्ट्रो टर्फशिवाय विभागीय क्रीडा संकुल परिपूर्ण होणार नाही; परंतु जागेअभावी येथे अ‍ॅस्ट्रो टर्फ हॉकीचे मैदान होऊ शकत नसल्याचे सांगितले. यावर आॅलिम्पिक संघटनेच्या पदाधिकाºयांनी कडक भूमिका घेतली.

अ‍ॅस्ट्रो टर्फ, सिंथेटिक ट्रॅकवर खेळण्याचा खेळाडूंचा हक्कच
विभागीय क्रीडा संकुलात क्रीडा प्रबोधिनीतील हॉकीचे आणि अ‍ॅथलेटिक्सचे खेळाडू सराव करीत असतात. त्यातील अनेकांनी राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचा अ‍ॅस्ट्रो टर्फ आणि सिंथेटिक ट्रॅकवर खेळण्याचा अधिकारच आहे. या सुविधा जर मिळत नसतील तर क्रीडा प्रबोधिनी येथे ठेवण्याचा काय अर्थ? असा पावित्रा मकरंद जोशी आणि पंकज भारसाखळे यांनी घेतला. त्याचप्रमाणे हॉकीचे मैदान असूनही या मैदानवर क्रिकेट खेळले जाते आणि हॉकी खेळणाºया क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडूंना मात्र सरावासाठी जागा राहत नसल्याचे या वेळी पंकज भारसाखळे यांनी नावंदे यांच्या लक्षात आणून दिले.

Web Title: Make available funds for astro turf, synthetic track, swimming pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :