महेश नवमी उत्साहात : जयघोषाने दुमदुमला परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:03 AM2018-06-22T00:03:39+5:302018-06-22T00:07:12+5:30

महेश नवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत माहेश्वरी बांधव आनंद आणि उत्साहात मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Mahesh Navami enthusiasm: Jayoghoshay Dumdulam campus | महेश नवमी उत्साहात : जयघोषाने दुमदुमला परिसर

महेश नवमी उत्साहात : जयघोषाने दुमदुमला परिसर

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबाद : भव्य शोभायात्रेत दिसली माहेश्वरी बांधवांची एकजूट

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘जय महेश...’, ‘ओम नम:शिवाय...’ अशा जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात गुरुवारी सायंकाळी खडकेश्वर येथील ऐतिहासिक मंदिराचा परिसर दुमदुमला. महेश नवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत माहेश्वरी बांधव आनंद आणि उत्साहात मोठ्या संख्येने सहभागी झाले.
माहेश्वरी समाजातर्फे महेशनवमीनिमित्त गुरुवारी सायंकाळी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. खडकेश्वर मंदिर परिसरात माहेश्वरी समाजातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी व महिला मंडळांनी दुपारी ३ वाजेपासूनच शोभायात्रेची जय्यत तयारी केली होती. ४.३० वाजेच्या सुमारास खडकेश्वर मंदिर येथे श्री महेशाची आराधना करून शोभायात्रेस सुरुवात झाली.


यानंतर खडकेश्वर मंदिराजवळ असणाऱ्या महेश चौकाला वंदन करण्यात आले. याप्रसंगी ओमप्रकाश चितलांगे, डॉ. नवनीत मानधने यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद तोतला, सचिव अनिल बाहेती, अनिल सोनी, सुनील मालानी, गोपाल जाजू, संजय सारडा, विनय राठी, नितीन भक्कड, नितीन तोष्णीवाल, सुनील सारडा, रजत सोनी, संजय दरख, महेश लखोटिया, श्रीवल्लभ सोनी, जगदीश कलंत्री, क ाशीनाथ दरख, जितेंद्र झंवर, चंद्रप्रकाश साबू, संजय दरख, संजय मंत्री, चंद्रकांत मालपाणी, डॉ. रमेश मालानी, रमेशचंद्र दरख, अरुण राठी, चंद्रकांत सोनी, रामनिवास मालपाणी, दीपक मुंदडा, संजय सिकची, मनीष चिचाणी, डॉ. रामबिलास मुंदडा, पुरुषोत्तम हेडा, प्रफुल्ल मालानी, निखिल करवा, श्याम सोमाणी, संतोष लखोटिया, शोभा बागला, रेखा राठी, किरण लखोटिया, रेखा मालपाणी, तारा सोनी, माधुरी धुप्पड यांच्यासह विविध प्रभागांतील पदाधिकाºयांची उपस्थिती होती.
या शोभायात्रेत विविध राजकीय पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शोभायात्रेदरम्यान माहेश्वरी बांधवांनी दाखविलेली शिस्त आणि समाजाची एकजूट कौतुकास्पद होती. सर्व पुरुषांनी पांढºया रंगाची आणि महिलांनी लाल-पिवळ्या रंगाची वेशभूषा केली होती.
सर्वांत आधी सावता महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी टाळ आणि मृदंगाच्या गजरात ठेका धरत मार्गस्थ झाले. यानंतर प्रमुख अतिथी आणि मान्यवर, त्यानंतर ढोलपथक आणि सामाजिक संदेश देणारे देखावे आणि शेवटी पुन्हा महिला आणि समाजबांधव अशा स्वरूपाची ही भव्य शोभायात्रा लक्षवेधक ठरली. खडकेश्वर मंदिर, गुलमंडी, टिळकपथ, पैठणगेट यामार्गे निघून शोभायात्रा तापडिया नाट्यमंदिर येथे विसर्जित झाली. ज्योती राठी, अर्चना भट्टड, पल्लवी मालानी, रेणुका बजाज, सरला सोनी यांनी शोभायात्रेसाठी प्रकल्पप्रमुख म्हणून काम पाहिले.
रक्तदानास उत्स्फूर्त प्रतिसाद
महेश नवमीनिमित्त दुपारी ३ वाजेपासून तापडिया नाट्यमंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याला समाजबांधवांचा आणि विशेषकरून महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उषा लोया, नम्रता राठी, कविता बाहेती, पद्मा झंवर यांनी प्रकल्पप्रमुख म्हणून काम पाहिले. मीना नावंदर, स्मिता मुंदडा, सुलोचना मुंदडा यांचे यासाठी सहकार्य लाभले.

Web Title: Mahesh Navami enthusiasm: Jayoghoshay Dumdulam campus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.