महावितरण, कम्बाईन बँकर्स विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:45 AM2018-03-25T00:45:23+5:302018-03-25T00:45:54+5:30

एमजीएमवर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक करंडक क्रिकेट स्पर्धेत महावितरण अ, बडवे इंजिनिअरिंग व कम्बाईन बँकर्स संघांनी विजय मिळवले. इनायत अली, महेंद्रसिंग कानसा व इंद्रजित उढाण हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.

Mahavitaran, Kambai Bankers, won | महावितरण, कम्बाईन बँकर्स विजयी

महावितरण, कम्बाईन बँकर्स विजयी

googlenewsNext
ठळक मुद्देइनायत अली, महेंद्रसिंग कानसा, इंद्रजित उढाण सामनावीर

औरंगाबाद : एमजीएमवर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक करंडक क्रिकेट स्पर्धेत महावितरण अ, बडवे इंजिनिअरिंग व कम्बाईन बँकर्स संघांनी विजय मिळवले. इनायत अली, महेंद्रसिंग कानसा व इंद्रजित उढाण हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.
पहिल्या सामन्यात महावितरण अ संघाविरुद्ध मनपा संघाने ११३ धावा केल्या. त्यांच्याकडून विशाल गवळी याने २९, प्रवीण क्षीरसागरने १८ व सचिन लव्हेराने १७ धावा केल्या. महावितरणकडून इनायत अलीने १६ धावांत ३ गडी बाद केले. ओम प्रकाश बकोरिया यांनी २, तर राहुल परदेशी, स्वप्नील चव्हाण यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात महावितरण संघाने विजयी लक्ष्य १७.१ षटकांत ३ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून राहुल शर्माने ७ चौकारांसह नाबाद ५१ धावा केल्या. पवन सूर्यवंशीने २१, स्वप्नील चव्हाणने १९ व इनायत अलीने ११ धावा केल्या. मनपाकडून कवरसिंग चव्हाणने २ व प्रवीण क्षीरसागरने १ गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात बडवे इंजिनिअरिंगने ८ बाद १५० धावा केल्या. त्यांच्याकडून इंद्रजित उढाणने ८ चौकारांसह ४६, वीरल पटेलने २७, ज्योतिबा विभुतेने १७ व जावेद शेखने २० धावा केल्या. डी. आर. ए. जी. ई. ओ.कडून हर्षवर्धन काळेने ३० धावांत ३, संतोष राऊतने २ आणि संदीप शिंदे व रोहित गायकवाड यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात डी. आय. ए. जी. ई. ओ. ९ बाद १३४ धावाच करू शकला. त्यांच्याकडून संतोष राऊतने ३२ व गौरव सपकाळने २८ धावा केल्या. बडवे इंजिनिअरिंगकडून ज्ञानेश्वर भुरंगे व शेख जावेद यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. राहुल पाटील व इंद्रजित उढाण यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. तिसºया सामन्यात जावेद शेख याने कम्बाईन बँकर्सने ५ बाद १९३ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून जावेद शेखने ३१ चेंडूंत ५ चौकार, ४ षटकारांसह ६१, मिलिंद पाटीलने २३ चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह ५४ व दिनेश कुंटेने ४२ धावांचे योगदान दिले. जिल्हा वकील कनिष्ठ संघाकडून शेख हनीफने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात जिल्हा वकील संघ ९५ धावांत सर्वबाद झाला. कम्बाईन बँकर्सतर्फे अनुभवी महेंद्रसिंग कानसाने १० धावांत ५ गडी बाद केले. नवनाथ वरकड व हिरल शाह यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
रविवार, २५ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता इंडोजर्मन टूलरूम वि. आॅटो स्कोडा, १०.३० वा. शहर पोलीस ब वि. आयुर्विमा, दु. २.१५ वा. मसिआ वि. वैद्यकीय प्रतिनिधी या संघात सामने होणार आहेत.

 

Web Title: Mahavitaran, Kambai Bankers, won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.