महाराष्ट्र एटीएसने सव्वाशे तरूणांचे केले मनपरिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:46 PM2019-03-30T23:46:30+5:302019-03-30T23:47:33+5:30

महाराष्ट्र एटीएसच्या या मॉडेलचा स्विकार देशभरातील प्रमुख राज्यांनी केला आहे.

Maharashtra ATS turns 52 turns of young minds | महाराष्ट्र एटीएसने सव्वाशे तरूणांचे केले मनपरिवर्तन

महाराष्ट्र एटीएसने सव्वाशे तरूणांचे केले मनपरिवर्तन

googlenewsNext
ठळक मुद्देएटीएसचे अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांची मुलाखत

- बापू सोळुंके 

औरंगाबाद: दहशतवादी मार्गाकडे वळलेल्या युवक-युवतींना नव्या जीवनाचा दिलासा देत विश्वासाने पुन्हा मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्याच्या कामात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आता महाराष्ट्र एटीएसच्या या मॉडेलचा स्विकार देशभरातील प्रमुख राज्यांनी केला. युवकांनी दहशतवादाकडे वळण्यापूर्वीच त्यांना शोधून त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी गुरूवारी लोकमतशी मनमोकळा संवाद साधला तेव्हा दिली. त्यांच्याशी झालेली बातचीत अशी:

लोकमत- लोकसभा निवडणुकीत आपल्यासमोर काय आव्हान वाटते ?
कुलकर्णी- लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था सांभाळणे आणि प्रचारसभानिमित्त होणाऱ्या व्ही.व्ही.आय.पी. आणि व्हीआयपी यांचे दौरे सुरक्षितपणे पार पाडणे हे पोलिसांसमोर प्रमुख आव्हाने आहेत.

लोकमत- ११ कोटीहून अधिक लोकसंख्येच्या महाराष्ट्रातील दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्या संशयितांचा कसा शोध लावता?
कुलकर्णी- दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी एटीएसचे अधिकारी प्रचंड मेहनत घेत असतात. त्याच्या अनेक पद्धती, थेअरी आहेत.

लोकमत- तुमचेच विदेशातील अधिकारी इंटरनेटवरून कट्टर विचारसरणीच्या तरूणांना जाळ्यात ओढतात आणि त्यांच्या माहितीवरून तुम्ही अशा तरूणांना उचलतात,असा आरोप एटीएसवर होता?
कुलकर्णी- अशा पद्धतीने तरूणांना अटक करण्यास आमचा विरोध आहे. आणि आम्ही आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये अशा मार्गाचा अवलंब केला नाही. भारतात असे करता येत नाही.

लोकमत- दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासोबत दहशतवादांकडे झुकणाऱ्या तरूणांचे समुपदेशन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम एटीएस करीत आहे हे खरे आहे का?
कुलकर्णी- कट्टरविचारसरणी असलेल्या तरूणांना इंटरनेटच्या माध्यमातून सिरीयातील लोक जाळ्यात ओढतात आणि त्यांना दहशतवादी कृत्य करण्यास प्रवृत्त करतात,असे अनेकदा समोर आले. यात तरूण-तरूणींची मोठी संख्या आहे. तरूणांना ताब्यात घेऊन आम्ही त्यांचे चार टप्प्यात समुपदेशन करतो. यात समुपदेशन करण्यासाठी त्याची स्वत:ची आणि कुटुंबाची तयारी आहे का हे पाहिले जाते. त्यानंतर मनोविकार तज्ज्ञ आणि धर्मगुरूं मार्फत तरूण-तरुणींच्या मनातील शंका दूर केल्या जातात. राज्यात तीन वर्षाच्या कालावधीत सुमारे सव्वाशे तरूण-तरूणींचे समुपदेशन करून त्यांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणले आहे.

लोकमत- समुपदेशनसाठी बोलविण्यात येणाºया तरूणांच्या सामाजिक अस्तित्वाला धोका निर्माण होतो का?
कुलकर्णी- नाही, दहशतवादाचा मार्ग स्विकारण्यापूर्वीच एटीएसकडून त्यांचे समुपदेशन करताना त्यांच्या सामाजिक आणि वैयक्तीक आयुष्याला कोणताही धोका होणार नाही,याची काळजी आम्ही घेतो. विशेषत: तो काम करतो, अथवा राहतो, त्या ठिकाणी आमचे एटीएसचे अधिकारी कर्मचारी जात नाही. त्याला एटीएसच्या कार्यालयात हजेरी द्यावी, अशी बंधने घातली जात नाही उलट त्याला वेळ मिळेल तेव्हा त्याने यावे असे त्यास सांगितले जाते. मात्र या तरूण-तरूणींच्या हालचालींवर अधिकाऱ्यांची कायम नजर असते.

लोकमत- एटीएसने आतापर्यंत किती जणांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षणही दिले?
?
उत्तर- एटीएसने तीन वर्षाच्या कालावधीत सुमारे साडेचारशे ते पाचशे तरूण-तरूणांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले. यातील सव्वाशे तरूण दहशतवादी मार्गाकडे वळलेले होते. त्यांचे मनपरिवर्तन करण्यात आम्हाला यश आले. या तरूण तरूणींना स्वयंरोजगाराचे मोफत प्रशिक्षण केंद्र सरकारच्या ग्रामीण स्वयंरोजगार योजनेतून दिले. एवढेच नव्हे तर अग्रणी बँकेच्या मदतीने ७० जणांना व्यवसायासाठी कर्जही उपलब्ध केले आहे.

महाराष्ट्र एटीएस मॉडेलची जम्मू-काश्मीरकडून मागणी
दहशतवादाकडे झुकणा-या तरूण-तरूणींचे समुपदेशन करणे आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे याकरीता मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन बँकेकडून कर्ज उपलब्ध करण्याचे काम तीन वर्षापासून एटीएस करीत आहे. महाराष्ट्र एटीएसचे हे काम एक मॉडेल म्हणून पाहिले जात आहे.या मॉडेलची जम्मू -काश्मीरसह, तेलंगणा, गुजरात आणि राजस्थान आदी राज्याकडून मागणी झाल्याचे अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

अमेरिकेत अटकेनंतर केले जाते आरोपीचे पुनर्वसन
अमेरिक ा देशात दहशतवाद्याला अटक करून जेलमध्ये टाकल्यानंतर त्याचे समुपदेशन केले जाते. त्यानंतर तो पुन्हा दहशतवादी मार्गाकडे वळणार नाही, यासाठी त्याचे पुनर्वसन केल्या जाते. महाराष्ट्र एटीएसने मात्र एखादा तरूण दहशतवादाकडे झुकत असल्याचे लक्षात येताच त्याला अटक न करता त्याचे समुपदेशन करून मनपरिवर्तन केल्या जाते. एटीएसकडून राबविण्यात येत असलेल्या या मॉडेलची दखल कें द्र सरकारने घेतली आणि गृहमंत्रालयात याकरीता स्वतंत्र विभाग सुरू केला.

Web Title: Maharashtra ATS turns 52 turns of young minds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.