इतिहासात शेतकऱ्यांना मिळाली नाही इतकी मदत युती सरकारने केली - मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 02:40 PM2019-03-17T14:40:59+5:302019-03-17T14:52:20+5:30

आघाडी सरकारने  ७०,००० कोटींची कर्जमाफी केली, पण ते हे सांगत नाही की, महाराष्ट्रात केवळ ४००० कोटी रुपये फक्त दिले, १५ वर्षात त्यांनी फक्त एकदा दिले, तर डांगोरा पिटतात. महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांना मिळाली नाही, इतकी मदत युती सरकारने केली असा दावा मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केला 

Lok Sabha Elections 2019 -In the history of Maharashtra farmers did not get the help of the Cong-NCP government - CM | इतिहासात शेतकऱ्यांना मिळाली नाही इतकी मदत युती सरकारने केली - मुख्यमंत्री 

इतिहासात शेतकऱ्यांना मिळाली नाही इतकी मदत युती सरकारने केली - मुख्यमंत्री 

googlenewsNext

औरंगाबाद -  आघाडी सरकारने  ७०,००० कोटींची कर्जमाफी केली, पण ते हे सांगत नाही की, महाराष्ट्रात केवळ ४००० कोटी रुपये फक्त दिले, १५ वर्षात त्यांनी फक्त एकदा दिले, तर डांगोरा पिटतात. महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांना मिळाली नाही, इतकी मदत युती सरकारने केली असा दावा मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केला. 

औरंगाबाद येथे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे अनेक मंत्री मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एअर स्ट्राइकनंतर संपूर्ण देश हवाई दलाचं कौतुक करत होता तर काहीजण एअर स्ट्राइकवर संशय घेत होते यावर मी काही बोलणार नाही. हा देश देशप्रेमींच्या सोबतच राहणार आहे, देशभक्तीने ओतप्रोत सरकार पुन्हा निवडण्याची जबाबदारी आपली आहे. हा नवा भारत आहे. आपली ताकद दाखविणारा हा भारत आहे. शत्रुची वाकडी नजर ठेचणारा हा भारत आहे त्यामुळे कोणाला निवडून द्यायचं हे लोकं ठरवतील. 

तसेच खोतकर-दानवे फेविकॉलचा जोड होणार आहे, कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन प्रचार करावा, भाजपा आणि शिवसेना एकमेकांना बोलले, पण मनाने आपण कधीच वेगळे झाले नव्हतो. सत्तेसाठी हे दोन पक्ष कधीच एकत्र आले नाही. मातृभूमीवर प्रेम करणारे नेहमीच एकमेकांच्या सोबत राहतात त्याचसोबत २४ तारखेला कोल्हापूर येथे महायुतीचे सर्व सहयोगी उपस्थित असतील असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगत विरोधकांनो काळजी करू नका. तुम्ही कितीही काडी केली, तरी सगळे सोबत राहणार आहेत असा टोला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला लगावला. 

औरंगाबादच्या समांतर पाणी पुरवठ्याच्या योजनेचा प्रश्न केवळ युतीचे सरकारच सोडवू शकते. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शाश्वत सिंचनाच्या सुविधा निर्माण होत आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील ८ ही जागा भाजपा-शिवसेनेच्याच निवडून येतील, यात अजिबात शंका नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Web Title: Lok Sabha Elections 2019 -In the history of Maharashtra farmers did not get the help of the Cong-NCP government - CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.