मोदी-फडणवीसांच्या कामांमुळे महाराष्ट्रात आघाडीचा ‘व्हाईटवॉश’ होणार : शाहनवाज हुसैन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 02:10 PM2019-04-15T14:10:30+5:302019-04-15T14:15:19+5:30

देशात भाजपा ३०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे केले भाकित

Lok Sabha Election 2019 : BJP will give whitewash to cngress allaince in Maharashtra : Shahnawaz Hussain | मोदी-फडणवीसांच्या कामांमुळे महाराष्ट्रात आघाडीचा ‘व्हाईटवॉश’ होणार : शाहनवाज हुसैन 

मोदी-फडणवीसांच्या कामांमुळे महाराष्ट्रात आघाडीचा ‘व्हाईटवॉश’ होणार : शाहनवाज हुसैन 

googlenewsNext
ठळक मुद्देमोदी-फडणवीसांच्या कामांचा परिणाम शाहनवाज हुसैन यांचा दावा 

औरंगाबाद : देशातील जनतेला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवे आहे. जनतेनेच स्वत: मोदी असल्याचे समजून कामाला सुरुवात केली आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, पूर्वोत्तर राज्ये आणि केरळमध्ये पक्षाला मोठे यश मिळणार आहे. महाराष्ट्रातही मोदींच्या तोडीचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ‘व्हाईटवॉश’ मिळणार आहे. ४८ जागांवर आघाडीचा सुपडासाफ करत भाजप-शिवसेना मुसंडी मारणार असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि केंद्रीय निवडणूक मंडळाचे सदस्य शाहनवाज हुसैन यांनी केला.

जालना जिल्ह्यातील युतीचे उमेदवार खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारसभांसाठी शाहनवाज हुसैन औरंगाबाद शहरात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशातील विविध राज्यांचा दौरा केला आहे. त्यामध्ये मोदी विरोधात सर्व असाच सामना रंगला आहे. देशातील जनतेला मोदी हवे आहे. विरोधी पक्षांना मोदी नको आहेत. मोदींना जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही. पराभव दिसत असल्यामुळे विरोधकांनी इव्हीएम मशिनवर राग काढण्यास सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले. आंधप्रदेशमध्ये मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू यांची अवस्था बिकट बनली. ते आता माजी मुख्यमंत्री बनणार आहेत. याशिवाय भाजपच्या पश्चिम बंगाल, केरळ, बिहार, पर्वोत्तर राज्यामध्ये भाजपच्या जागा वाढणार आहेत. उत्तरप्रदेशमध्ये मागील वेळा ७३ जागा निवडून आल्या होत्या. यावेळी ७४ जागा निवडून येतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला. देशात सगळीकडे मोदी यांच्याच नावाचा बोलबाला आहे. 

वंचित बहुजन आघाडी सोबत संबंध नाही

महाराष्ट्रात मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकही जागा निवडूण येणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम ही भाजपची बी टिम असल्याचा आरोप होत आहे, यावर बोलताना शाहनवाज हुसैन म्हणाले, दोन्ही पक्षांची स्वतंत्र विचारधारा आहे. एमआयएमसोबत भाजप कधीही जाऊ शकत नाही, त्यांच्याशी आमचे कोणतेही संबंध नाही. दोघांचे मार्ग वेगळे असल्यामुळे काँग्रेसकडून होत असलेले आरोप चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आझम खान यांनी मर्यादा ओलांडल्या
उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपुर लोकसभाा मतदार संघाचे उमेदवार  आझम खान यांनी भाजपच्या उमेदवार जया प्रदा यांच्याबाबत केलेले वक्तव्य हे सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडणारे आहे. त्यांची विचार करण्याची पद्धतच घाणेरडी आहे. त्यांच्या विचारात व्हायरस आहे. त्या व्हायरसने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आता त्यांना रामपूरसह उत्तरप्रदेश आणि देशातील महिला माफ करणार नाहीत. त्यांचा पराभव हा निश्चितच होणार असल्याचेही शाहनवाज हुसैन यांनी स्पष्ट केले.

Web Title: Lok Sabha Election 2019 : BJP will give whitewash to cngress allaince in Maharashtra : Shahnawaz Hussain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.