लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सर्वाधिक वीज गळती असणाºया फिडरवर लोडशेडिंग केली जात असली, तरी कमी वीज गळती असलेले फिडरदेखील यातून सुटले नाहीत. मंगळवारी सकाळी ११.३० वा. महावितरणच्या राज्य कार्यालयाकडून निर्णय आला आणि शहरातील ‘सी’ आणि ‘डी’ या प्रवर्गाच्या फिडरची लाईटही गुल करण्यात आली.
शहरात कालपासून तब्बल ९ तासांपर्यंत लोडशेडिंग केली जात आहे.
यासंदर्भात मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, शहरात एकूण २ लाख ८२ हजार वीज ग्राहक असून, यामध्ये प्रामुख्याने निवासी ग्राहकांमध्येच वीज चोरीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शहरात महावितरणला दर महिन्याला ४० टक्के वीज गळतीचा फटका बसत आहे. सोमवारपासून लोडशेडिंग करण्यात आली असून, याची झळ नियमित बिल भरणारे आणि विजेची चोरी करणाºया ग्राहकांना बसत आहे.