शाळांमध्ये घुमतोय लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:10 AM2018-03-19T01:10:52+5:302018-03-19T01:12:13+5:30

लिटिल एंजल इंग्लिश स्कू ल प्रस्तुत कॅम्पस क्लब शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलची सध्या अनेक शाळांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्ताने बालकलाकारांचे अभिनय करण्याचे आणि दिग्दर्शन करण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्यामुळे विद्यार्थी ‘फुल टू मस्ती’ करीत चित्रीकरणाचा आनंद लुटत आहेत. शहरातील शाळांतून लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन, असे शब्द आपल्या कानी पडल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये.

Light, camera, action in schools! | शाळांमध्ये घुमतोय लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन !

शाळांमध्ये घुमतोय लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लिटिल एंजल इंग्लिश स्कू ल प्रस्तुत कॅम्पस क्लब शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलची सध्या अनेक शाळांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्ताने बालकलाकारांचे अभिनय करण्याचे आणि दिग्दर्शन करण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्यामुळे विद्यार्थी ‘फुल टू मस्ती’ करीत चित्रीकरणाचा आनंद लुटत आहेत. शहरातील शाळांतून लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन, असे शब्द आपल्या कानी पडल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये.
दि. २४ मार्च रोजी सायं. ६ वा. लोकमत लॉन्स येथे होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात विद्यार्थ्यांनी बनविलेले चित्रपट प्रदर्शित करण्यात येतील. कॅम्पस क्लबच्या सर्व सदस्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे.
एका चित्रपटाच्या निर्मितीत कमीत कमी १० व जास्तीत जास्त १५ विद्यार्थ्यांचा सहभाग असावा. डॉक्युमेंट्री, कथा, प्रायोगिक, काल्पनिक, वास्तववादी यापैकी कुठल्याही प्रकारातला लघु चित्रपट विद्यार्थी बनवू शकतात.
इंग्रजी भाषेत नसणाºया चित्रपटांना इंग्रजीतील सबटायटल असावे. लघु चित्रपटांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी अभिनय करणे अपेक्षित आहे. कमीत कमी ८ व जास्तीत जास्त १२ मिनिटांचा लघु चित्रपट बनवावा. विद्यार्थ्यांनी त्यांच्या चित्रपटाची डीव्हीडी दि. २० मार्चपर्यंत लोकमत भवन येथे जमा करणे अपेक्षित आहे. यानंतर येणा-या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.
गिटार अ‍ॅण्ड गिग्ज हे या कार्यक्रमाचे असोसिएट स्पॉन्सर्स आहेत. आकाश फाऊंडेशन हे एज्युकेशन पार्टनर, मित्तल आॅप्टिकल्स हे आय केअर पार्टनर, एसएसप्रो हे साऊंड अ‍ॅण्ड लाईट पार्टनर, रेडिओ मिर्ची हे रेडिओ पार्टनर, दी अल्ट्रा आऊटडोअर हे आऊटडोअर पार्टनर, दी नुक्कड ईट ट्रीट हे फूड पार्टनर, प्रोझोन मॉल हे पार्टनर, अंजली टेम्प्लेस एलएलपी हे ट्रॉफी पार्टनर
आहेत.

Web Title: Light, camera, action in schools!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.