कर्जमाफीचे पत्र चक्क खोटे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:29 PM2019-01-21T23:29:36+5:302019-01-21T23:30:13+5:30

शेतकºयाला बँकेने दिलेले कर्जमाफीचे पत्र पुन्हा एकदा चक्क खोटे ठरले आहे. तुम्हाला दिलेले कर्जमाफीचे पत्र नजरचुकीने दिल्याचे सांगत महाराष्ट्र बँकेच्या करमाड शाखेने शेतकºयाच्या बचत खात्यातील रक्कम परस्पर कर्जखात्यात वळती करून घेतली आहे.

The letter of loan forgery is false ... | कर्जमाफीचे पत्र चक्क खोटे...

कर्जमाफीचे पत्र चक्क खोटे...

googlenewsNext
ठळक मुद्देबँक म्हणते, नजरचुकीने माफ केले कर्ज : गोलटगावच्या शेतकऱ्याची आत्महत्येस परवानगी देण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती

श्रीकांत पोफळे
शेंद्रा /दुधड : शेतकºयाला बँकेने दिलेले कर्जमाफीचे पत्र पुन्हा एकदा चक्क खोटे ठरले आहे. तुम्हाला दिलेले कर्जमाफीचे पत्र नजरचुकीने दिल्याचे सांगत महाराष्ट्र बँकेच्या करमाड शाखेने शेतकºयाच्या बचत खात्यातील रक्कम परस्पर कर्जखात्यात वळती करून घेतली आहे. त्यामुळे गोलटगाव (ता.औरंगाबाद) येथील शेतकरी मुसा अकबर पटेल यांनी प्रजासत्ताकदिनी (दि.२६ जानेवारी) बँकेत विष प्राशन करून आत्महत्येला परवानगी मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री, बँक व्यवस्थापनासह अनेकांना केली आहे.
मुसा पठाण यांनी बँक आॅफ महाराष्ट्रच्या करमाड शाखेकडून चार वर्षांपूर्वी दीड लाख रुपये पीककर्ज घेतले होते; परंतु सततच्या दुष्काळामुळे ते कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. २०१६ च्या शासन आदेशानुसार त्यांना बँकेकडून कर्जाचे पुनर्गठन करून परत ६८ हजार रुपये वाढीव कर्ज देण्यात आले. महाराष्ट्र शासनाने पुढे दुष्काळामुळे शेतकºयांचे कर्ज माफ केले. या योजनेत पठाण यांनाही कर्जमाफीचे पत्र बँकेने दिले होेते.
मुसा पठाण यांना बँकेने एक लाख ७५ हजार रुपये नवीन कर्ज दिले; परंतु शासनाकडून दुष्काळात वाढीव मिळालेले कर्ज ६८ हजार रुपये व्याजासह ८१ हजार रुपये भरून घेण्यात आले. उर्वरित रक्कम सदर शेतकºयाच्या बचत खात्यात जमा करण्यात आली. सदर शेतकºयाने त्या बचत खात्यातून ३० हजार रु. काढले. उर्वरित रक्कम मुलीच्या लग्नासाठी बचत खात्यात जमा ठेवली; परंतु त्या खात्यातील रकमेतून बँक अधिकाºयांनी ४० हजार रुपये संबंधित शेतकºयाच्या कर्ज खात्यात परस्पर जमा केले.
त्यानंतर मुसा पठाण यांनी बँके शी संपर्क साधला. तेव्हा तुमचे कर्ज माफ झालेले नाही. तुम्हाला जे कर्जमाफीचे पत्र देण्यात आले ते नजरचुकीने देण्यात आले, असे अधिकाºयांनी सांगितले.
अधिकाºयांच्या खुलाशामुळे संतप्त झालेले शेतकरी मुसा पठाण यांनी प्रजासत्ताकदिनी बँकेसमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करणारे निवेदन मुख्यमंत्री, प्रधान सचिव, विभागीय सहनिबंधक, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, शाखा प्रबंधक आदींना पाठविले आहे.

आधी कर्जमाफी, नंतर रद्द
बँक अधिकाºयांनी माझी फसवणूक केली आहे. मला सुरुवातीला दीड लाख रुपये कर्ज माफ झाल्याचे पत्र दिले, नंतर मला वाढीव कर्जही दिले. आता मला बँकेकडून असे सांगण्यात आले आहे की, तुमचे कर्ज माफ झालेले नाही. माझ्या खात्यावरील रक्कम परस्पर काढून घेण्यात आली. बचत खात्यावरील रक्कम मी मुलीच्या लग्नासाठी ठेवली होती. मुलीचे लग्न २० दिवसांवर येऊन ठेपले आहे. आता मी काय करू?
मुसा पठाण, शेतकरी, गोलटगाव
-----------------------------------------
नजरचुकीने दिले कर्जमाफीचे पत्र
संबंधित शेतकºयाला पूर्वीच्या अधिकाºयांकडून नजरचुकीने कर्जमाफीचे पत्र देण्यात आले; परंतु कर्जमाफीमध्ये सदर शेतकरी पात्र झालेला नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे जुलै २०१७ पर्यंत थकीत शेतकºयांचे कर्ज माफ झालेले आहे; परंतु पठाण यांनी घेतलेल्या कर्जाचा हप्ता डिसेंबर २०१७ मध्ये असल्याने या शेतकºयाला कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. तरीसुद्धा वरिष्ठांना कर्जदार शेतकºयाच्या कर्जाचा तपशील पाठवला असून, वरिष्ठांनी कर्जमाफ करण्यास सहमती दर्शविली आहे. शेतकºयाचे खाते थकीत असल्याने त्यांच्या खात्यावरील ४० हजार रुपये काढण्याचा अधिकार बँकेला आहे.
कैलास कच्छवे, शाखा व्यवस्थापक
महाराष्ट्र बँक

Web Title: The letter of loan forgery is false ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.