' बिबट्या आला रे आला' ...औरंगाबादमध्ये व्हायरल खबरीने सारेच झाले सतर्क  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 07:24 PM2017-12-23T19:24:00+5:302017-12-23T19:26:59+5:30

या वृत्ताविषयी वन विभागानेही शहराच्या लगत बिबट्याला सहज भक्ष्य मिळत असल्याने परिसरात बिबट्या वावर असू शकतो असे म्हटले आहे. यामुळे नागरिक व वन विभाग असे सारेच यातील सत्यता बाहेर येई पर्यंत  सतर्क झाले आहेत.

'Leopard has rehearsed' ... Viral reports in Aurangabad are all cautious | ' बिबट्या आला रे आला' ...औरंगाबादमध्ये व्हायरल खबरीने सारेच झाले सतर्क  

' बिबट्या आला रे आला' ...औरंगाबादमध्ये व्हायरल खबरीने सारेच झाले सतर्क  

googlenewsNext
ठळक मुद्देसातारा-नक्षत्रवाडी परिसरात बिबट्याचे जलवाहिनीवर दर्शन झाल्याचे वृत्त सोशल मिडीयावर व्हायरलवनविभागाने राबवली सर्च मोहीम 

- साहेबराव हिवराळे-

औरंगाबाद : सातारा-नक्षत्रवाडी परिसरात बिबट्याचे जलवाहिनीवर दर्शन झाल्याचे वृत्त सोशल मिडीयावर व्हायरल झालं अन् पालकांनी मुलांना घराबाहेर पडू दिलं नाही. या वृत्ताविषयी वन विभागानेही शहराच्या लगत बिबट्याला सहज भक्ष्य मिळत असल्याने परिसरात बिबट्या वावर असू शकतो असे म्हटले आहे. यामुळे नागरिक व वन विभाग असे सारेच यातील सत्यता बाहेर येई पर्यंत  सतर्क झाले आहेत.

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून बिबट्याचे दर्शन होणे ही बाब नवीन राहिली नाही. वन विभागाने जिल्ह्यात विविध ठिकाणी पिंजरे देखील लावून ठेवले आहेत. त्यावर वन कर्मचारी, वनरक्षकाची टिम देखील लक्ष ठेवून असतात. यामध्ये या टीमला बरेचदा शेतात बिबट्याच्या पायाचे ठस्से आढळून आले आहेत. यासोबतच शेतवस्तीवरील जनावरांवर हल्ल्याच्याही घटना तुरळक घडल्या आहेत.   

शहरात देखील वावर 
वेरूळ, वाळूज, गोलवाडी, तिसगाव, बनेवाडी, नक्षत्रवाडी, पैठण, गंगापूर,वैजापूर, कन्नड तसेच सातारा वनक्षेत्रात बिबट्या आढळून आला आहे. यासोबतच खामनदीच्या कडेला झाडा-झुडूपाचा आसरा असल्याने या परिसरात दोन वर्षापूर्वी बिबट्या आढळून आला होता. 

बिबट्या दिसल्याचे व्हायरल 
रेल्वेस्टेशनपासून ते नक्षत्रवाडी, कांचनवाडी, सातारा परिसरात डोंगराळ भाग असून सध्या तेथे जलसाठे देखील बर्‍यापैकी आहेत. याच भागात नाथ व्हॅलीजवळील जलवाहीनीवर गुरूवारी रात्री दिमाखात बसलेल्या बिबट्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. बिबट्याचे चमकणारे डोळे आणि चालतानाचे फोटो सोशल मिडीयावर आल्याने खळबळ उडाली. नागरिकांमधील अस्वस्थता टाळण्यासाठी या फोटो मधील सत्यता स्पष्ट होणे गरजेचे आहे अशी मागणी समाजसेवक दिपक पाडळकर यांनी केली आहे. 

सर्चिंग सुरू आहे
याबाबत उपवन संरक्षक एस.पी. वडस्कर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि, बिबट्या दिसल्याची  माहिती पुढे आली असून, खबरदारी म्हणून आम्ही सर्चिंग सुरू केली आहे. याची खात्री केल्यावरच अधिक माहिती देता येईल.

Web Title: 'Leopard has rehearsed' ... Viral reports in Aurangabad are all cautious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.