लॅण्ड होणारे विमान पुन्हा झेपावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:31 PM2019-04-13T23:31:53+5:302019-04-13T23:32:37+5:30

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर उतरणारे एअर इंडियाचे विमान वातावरणातील बदलामुळे ऐनवेळी पुन्हा आकाशात झेपावल्याची घटना शनिवारी (दि.१३) ...

Landed aircraft returned again | लॅण्ड होणारे विमान पुन्हा झेपावले

लॅण्ड होणारे विमान पुन्हा झेपावले

googlenewsNext
ठळक मुद्देखराब वातावरण : पाच मिनिटे आकाशात घिरट्या


औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर उतरणारे एअर इंडियाचेविमान वातावरणातील बदलामुळे ऐनवेळी पुन्हा आकाशात झेपावल्याची घटना शनिवारी (दि.१३) रात्री घडली. शहरावर पाच मिनिटे घिरट्या घालून या विमानाचे पुन्हा सुखरूप लॅण्डिंग झाले आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
एअर इंडियाचे विमान दिल्लीहून औरंगाबादला शनिवारी सायंकाळी ७.४५ वाजता पोहोचणार होते. हे विमान शहराच्या आकाशात नियोजित वेळेवर पोहोचलेही. हे विमान धावपट्टीवर उतरत असताना वातावरणातील बदलाने विजेचा कडकडाट आणि वेगाने वाहणाऱ्या वाºयामुळे विमान पुन्हा आकाशात नेण्याचा निर्णय वैमानिकाने घेतला. त्यामुळे प्रवाशांना काय झाले, हे काही वेळेसाठी कळलेच नाही. जवळपास पाच मिनीट विमानाने आकाशात घिरट्या घातल्या. वातावरण अनुकूल झाल्यानंतर विमान सुखरूपपणे ७.५० वाजता लॅण्ड झाले.
अधिकाऱ्यांचा दुजोरा
या घटनेला एअर इंडियाच्या अधिकाºयांनी दुजोरा दिला असून, वातावरणातील बदलामुळे विमानाला पुन्हा टेकआॅफ घ्यावे लागले; परंतु विमान लगेच धावपट्टीवर उतरले, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Landed aircraft returned again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.