नोटाबंदीनंतर जमिनीच्या व्यवहारांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 01:27 AM2017-08-24T01:27:05+5:302017-08-24T01:27:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेल्या नोटाबंदीनंतर राज्यभरात जमिनीच्या व्यवहारांसह स्टॅम्प ड्यूटीच्या महसुलाला १० टक्क्यांचा फटका ...

 Land deal breaks after the anniversary | नोटाबंदीनंतर जमिनीच्या व्यवहारांना फटका

नोटाबंदीनंतर जमिनीच्या व्यवहारांना फटका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेल्या नोटाबंदीनंतर राज्यभरात जमिनीच्या व्यवहारांसह स्टॅम्प ड्यूटीच्या महसुलाला १० टक्क्यांचा फटका बसल्याची माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी नोंदणी उपमहानिरीक्षक चिंतामण भूरखंडे, प्रकाश खोमणे, उपनिरीक्षक जी. एस. कोळेकर,
डी. जे. माईनकर यांची उपस्थिती होती.
कवडे मराठवाड्याच्या दौºयावर असून, त्यांनी बुधवारी औरंगाबाद विभागाचा आढावा घेऊन लातूरकडे प्रस्थान केले. आता परिस्थिती पूर्वपदावर आली असून, मुंबई, पुणे, ठाणे या जिल्ह्यांत नोटाबंदीनंतर फारसा परिणाम झाला नसल्याचेही कवडे यांनी नमूद केले. त्या भागांत फ्लॅटचे व्यवहार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यावर नोटाबंदीचा परिणाम झाला नाही. चालू आर्थिक वर्षात २१ हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे लक्ष्य राज्यभरात आहे. २१ आॅगस्टपर्यंत ८ हजार २१ कोटी रुपयांचा महसूल विभागाला मिळाला आहे.
‘रेरा’ मुळे मुद्रांक विभागाला काय फायदा झाला आहे, त्यावर कवडे म्हणाले, त्याचा फायदा बिल्डर आणि ग्राहकांना होणार आहे. यावर्षी १७६ कोटी रुपयांचा महसूल आॅगस्ट महिन्यापर्यंत मिळाला असून, मागील वर्षी १७९ कोटी रुपयांचा
महसूल मुद्रांक शुल्कातून मिळाला होता. ३ कोटी रुपयांनी महसूल घटला आहे.

Web Title:  Land deal breaks after the anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.