कोरेगाव-भीमा येथील घटना दुर्दैवी, मात्र एल्गार परिषदेमुळे नाही झाली दंगल - रामदास आठवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 03:58 PM2018-01-15T15:58:02+5:302018-01-15T17:12:14+5:30

प्रकाश आंबेडकरांनी पुण्यात घेतलेल्या एल्गार परिषदेमुळे कोरेगाव-भीमाची दंगल झालेली नाही. कोपर्डी येथील घटना, अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर व वढू गावातील प्रकरणाचा परिपाक म्हणजेच कोरेगाव भीमा येथील घडलेली घटना आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले. 

Karegaon-Bhima incident is unfortunate, but not just due to Elgar conference - Ramdas Athavale | कोरेगाव-भीमा येथील घटना दुर्दैवी, मात्र एल्गार परिषदेमुळे नाही झाली दंगल - रामदास आठवले 

कोरेगाव-भीमा येथील घटना दुर्दैवी, मात्र एल्गार परिषदेमुळे नाही झाली दंगल - रामदास आठवले 

googlenewsNext

औरंगाबाद : प्रकाश आंबेडकरांनी पुण्यात घेतलेल्या एल्गार परिषदेमुळे कोरेगाव-भीमाची दंगल झालेली नाही. कोपर्डी येथील घटना, अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर व वढू गावातील प्रकरणाचा परिपाक म्हणजेच कोरेगाव भीमा येथील घडलेली घटना आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिन समारंभास उपस्थित राहण्यासाठी रामदास आठवले हे रविवारी औरंगाबादेत आले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, दलित-मराठा समाजामध्ये दरी निर्माण करण्याचे काही मराठा व हिंदुत्ववादी संघटनांचे मोठे षङ्यंत्र असून, या घटनेचे बोलविते धनी कोण आहेत, याचा शोध घेऊन त्यांना पोलिसांनी अटक करावी. यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. या घटनेच्या दुसर्‍या दिवशी राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. माझाही पक्ष बंदमध्ये सहभागी होता. माझ्याही अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. 

पोलिसांनी धरपकड करून दलित कार्यकर्त्यांविरुद्ध काही ठिकाणी ३०७, तर काही ठिकाणी ३९५ कलमांन्वये दरोड्याचे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत. दगडफेक करताना जे कार्यकर्ते फुटेजमध्ये दिसत असतील त्यांच्यावरच कारवाई करावी, याबद्दलही आपण मुख्यमंत्र्यांसोबत बोललो आहे. मराठा समाजाने मात्र अतिशय संयमाची भूमिका घेतली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. दलित व मराठा समाजाने सोबत राहून गावगाडा हाकला पाहिजे. या दोन समाजात दरी निर्माण होणे, हे परवडणारे नाही. मराठा समाजाने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतो, अशी चुकीची भावना ठेवू नये. या कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मराठा समाजाच्या तरुणांनीही कोणाच्या भयकाव्यात येऊ नये. 

जिग्नेश यांनी आंबेडकरवादी बनावे

जिग्नेश मेवानी यांच्यासंदर्भात आठवले म्हणाले की, जिग्नेश यांनी अगोदर आंबेडकरवादी बनावे. खरा आंबेडकरवादी कार्यकर्ता ‘लाल सलाम’ कधीच म्हणत नाहीत. नक्षलवाद्यांच्या चळवळीबद्दल बोलताना ते म्हणाले, नक्षलवाद्यांचा मोठा त्याग आहे; पण त्यांच्या चळवळीत हिंसा आहे. ते आम्हाला मान्य नाही. ते आदिवासी समाजाला न्याय मिळण्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहात यावे लागेल. 

‘एक विचार-एक मंच’ तकलादू
विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक युवकांनी आंबेडकरी पक्ष-संघटनांच्या वेगवेगळ्या व्यासपीठाला विरोध केला आहे. एकाच व्यासपीठावर दलित नेत्यांनी यावे, असा त्यांचा आग्रह आहे. एक दिवस एका स्टेजवर येण्याने ऐक्य होणार आहे का, असा प्रश्न रामदास आठवले यांनी उपस्थित केला. ऐक्य तकलादू नसावे. यासाठी अगोदर ऐक्याचा फार्म्युला तयार करायला पाहिजे. समाजाने एकत्र यायला हवे. नेते फुटले तरी समाजाने फुटू नये. कार्यकर्ते एकत्र आले, तर नेत्यांनाही एकत्र यावेच लागेल, असे ते म्हणाले.

Web Title: Karegaon-Bhima incident is unfortunate, but not just due to Elgar conference - Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.