जॉन्सन, शहर पोलीस अ, गुडईअर उपांत्यपूर्व फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:44 AM2018-04-17T00:44:14+5:302018-04-17T00:45:39+5:30

एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत जॉन्सन अँड जॉन्सनने ए.आय.टी. संघावर, ‘शहर पोलीस अ’ने मसिआ संघावर, तर गुडईअरने एनएचकेवर मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पहिल्या सामन्यात जॉन्सन अँड जॉन्सनने ५ बाद १९१ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून स्वप्नील खडसेने २ षटकार व १0 चौकारांसह ७४, प्रवीण क्षीरसागरने २ चौकार व ६ षटकारांसह ४९ धावा केल्या.

Johnson, City Police A, Goodyear in the quarterfinals | जॉन्सन, शहर पोलीस अ, गुडईअर उपांत्यपूर्व फेरीत

जॉन्सन, शहर पोलीस अ, गुडईअर उपांत्यपूर्व फेरीत

googlenewsNext
ठळक मुद्देशेख मुकीमची स्फोटक खेळी : स्वप्नील, ऋषिकेश सामनावीर

औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत जॉन्सन अँड जॉन्सनने ए.आय.टी. संघावर, ‘शहर पोलीस अ’ने मसिआ संघावर, तर गुडईअरने एनएचकेवर मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
पहिल्या सामन्यात जॉन्सन अँड जॉन्सनने ५ बाद १९१ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून स्वप्नील खडसेने २ षटकार व १0 चौकारांसह ७४, प्रवीण क्षीरसागरने २ चौकार व ६ षटकारांसह ४९ धावा केल्या. ईशांत राय व विजय ढेकळे यांनी अनुक्रमे २९ व २५ धावांचे योगदान दिले. ए.आय.टी.जी.कडून दशवीरसिंह छाबडा व जीवन कांबळे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात ए.आय.टी.जी. ८ बाद १११ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून दशवीरसिंह छाबडाने नाबाद ३३ धावा केल्या. अक्षर अकूडने १९ धावा केल्या. जॉन्सन अँड जॉन्सनकडून सचिन सबनीस व ईशांत राय यांनी प्रत्येकी २, तर अनिरुद्ध पुजारी व हर्षद वैद्य यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात शहर पोलीस अ संघाने ६ बाद १८१ धावा केल्या. त्यांच्याकडून शेख मुकीमने ७१ चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह ९६ धावा केल्या. राहुल जोनवालने ३५ व सुदर्शन एखंडेने २७ धावा केल्या. मसिआकडून अतिक नाईकवाडेने ४४ धावांत ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात मसिआ संघ ७ बाद १२0 धावा केल्या. त्यांच्याकडून रोहन राठोडने ४0, अतिक नाईकवाडेने ३६ धावा केल्या. ‘शहर पोलीस अ’कडून मिलिंद भंडारीने २, तर मोहंमद इम्रान, राहुल जोनवाल व शेख जिलानी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
तिसºया सामन्यात गुडईअरविरुद्ध एनएचकेचा संघ ४७ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून अनिकेत म्हस्केने १४ व कैलास हजारेने १३ धावा केल्या. गुडईअरकडून ऋषिकेश नायरने ६ धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात गुडईअने विजयी लक्ष्य ७.५ षटकांत गाठले. त्यांच्याकडून ऋषिकेश नायरने २७ व अरविंद यादवने १९ धावा केल्या. एनएचकेकडून अनिल भवरने १ गडी बाद केला.
येत्या शुक्रवारी सकाळी १0.३0 वाजता जॉन्सन वि. महावितरण अ, दुपारी २ वाजता गुडईअर व कम्बाईन बँकर्स यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळवण्यात येणार आहेत, असे संयोजक गंगाधर शेवाळे व दामोदर मानकापे यांनी कळवले आहे.

Web Title: Johnson, City Police A, Goodyear in the quarterfinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.