जायकवाडी धरणात अर्ध्या टक्क्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:36 AM2018-07-18T01:36:27+5:302018-07-18T01:36:57+5:30

जायकवाडी धरणात मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ७,७५७ क्युसेक क्षमतेने पाण्याची आवक सुरू झाली. सायंकाळी ६ वाजता आवक वाढून १८,१०० एवढी झाली. दरम्यान, अवघ्या तीन तासांत धरणाच्या जलसाठ्यात अर्धा टक्क्याने वाढ झाली. धरणात मंगळवारी सायंकाळी १९.३० टक्के जलसाठा झाला होता.

Jaikwadi dam up to half percent increase | जायकवाडी धरणात अर्ध्या टक्क्याने वाढ

जायकवाडी धरणात अर्ध्या टक्क्याने वाढ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : जायकवाडी धरणात मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ७,७५७ क्युसेक क्षमतेने पाण्याची आवक सुरू झाली. सायंकाळी ६ वाजता आवक वाढून १८,१०० एवढी झाली. दरम्यान, अवघ्या तीन तासांत धरणाच्या जलसाठ्यात अर्धा टक्क्याने वाढ झाली. धरणात मंगळवारी सायंकाळी १९.३० टक्के जलसाठा झाला होता.
यंदा जुलै महिना अर्धा संपत आला असतानाही धरणात थेंबभर पाण्याची आवक झालेली नव्हती. यामुळे धरण प्रशासनासह मराठवाड्यातील जनतेच्या नजरा या पाण्याकडे लागल्या होत्या. मंगळवारी धरणात मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाल्याने मराठवाडाभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून मंगळवारी विसर्ग वाढविण्यात आल्याने जायकवाडीत येणारी आवक मंगळवारी मध्यरात्रीपासून वाढणार असल्याचे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात शनिवारपासून संततधार कायम असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे.
सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून पाण्याचा विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला होता. मंगळवारी यात दुपटीने वाढ झाल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे जायकवाडीत येणारी आवक सतत वाढत आहे.
पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस
रविवारी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांत विक्रमी पावसाची नोंद झाली होती. गेल्या २४ तासांत पुन्हा इगतपुरी १४३ मि.मी. व त्र्यंबकेश्वर (पान २ वर)
नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळपासून गंगापूर, दारणा, पुणंद व चणकापूर या धरणांतून विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला होता. मंगळवारी या विसर्गात दुपटीने वाढ करण्यात आली. दारणा धरणातून १०,६०० क्युसेक, तर गंगापूर धरणातून ९,३०२ क्युसेक क्षमतेने आजही विसर्ग कायम ठेवण्यात आला होता. मात्र, नांदूर-मधमेश्वर बंधा-यातून गोदावरी पात्रात होणारा विसर्ग दुप्पट करीत तो २९,५९४ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. यामुळे गोदावरीस पूर आला असून, गतीने हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होत आहे.
तीन तासांत
अर्धा टक्का वाढ
जायकवाडी धरणात आवक सुरू होण्यापूर्वी जलसाठा १८.७९ टक्के एवढा होता. दरम्यान, तीन वाजेस धरणात आवक सुरू झाली व ६ वाजता जलसाठा १९.३० टक्के एवढा झाला होता. धरणात ११.०७१ द.ल.घ.मी. एवढी वाढ नोंदविली गेली.
मंगळवारी धरणात एकूण जलसाठा १,१५७.२४० द.ल.घ.मी., तर उपयुक्त जलसाठा ४१९.१३४ एवढा झाला आहे, असे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे, रमेश चक्रे व श्याम शेळके यांनी सांगितले.

Web Title: Jaikwadi dam up to half percent increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.