म्हणे...कारच्या टपावर ठेवलेले पंधरा लाख रुपये पडले आणि कुणीतरी पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:00 PM2018-12-13T22:00:24+5:302018-12-13T22:00:52+5:30

पाचोड येथील एका पतसंस्थेचे पंधरा लाख औरंगाबादेतील बँकेत जमा करण्यासाठी आणताना कारच्या टपावरून पडले आणि कुणीतरी उचलून नेले. ही घटना गुरुवारी सकाळी केम्ब्रिज चौकात घडली.

It is said ... 15 lakh rupees lying on the car, and somebody ran | म्हणे...कारच्या टपावर ठेवलेले पंधरा लाख रुपये पडले आणि कुणीतरी पळविले

म्हणे...कारच्या टपावर ठेवलेले पंधरा लाख रुपये पडले आणि कुणीतरी पळविले

googlenewsNext
ठळक मुद्दे पोलिसांकडून चौकशी: पतसंस्थेची रक्कम, पोलिसांकडून कसून शोध

औरंगाबाद : पाचोड येथील एका पतसंस्थेचे पंधरा लाख औरंगाबादेतील बँकेत जमा करण्यासाठी आणताना कारच्या टपावरून पडले आणि कुणीतरी उचलून नेले. ही घटना गुरुवारी सकाळी केम्ब्रिज चौकात घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंद करण्यात आली.
पोलिसांनी सांगितले की, सिडको एन-१ येथील रहिवासी संजयकुमार पाटणी हे पाचोड येथील वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक आहेत. या पतसंस्थेतील जमा होणारी रक्कम ते औरंगाबादेतील बँकेत जमा करतात. नेहमीप्रमाणे बुधवारी पतसंस्थेत जमा झालेले पंधरा लाख रुपये घेऊन ते रात्री औरंगाबादेत आले. रात्री ते सिडको एन-१ येथील त्यांच्या घरी मुक्कामी थांबले होते. गुरुवारी सकाळी जालना येथील एका कार्यक्रमासाठी त्यांना जायचे होते. मात्र तत्पूर्वी ही रक्कम बँकेत जमा करणे आवश्यक असल्याने त्यांनी पंधरा लाख रुपयांचे असलेले पाकीट कारच्या सीटखाली ठेवले. मात्र गडबडीत ते नातेवाईक महिलांना कारमध्ये बसवून जालन्याकडे निघाले. काही वेळानंतर त्यांच्या भावाने त्यांना फोन केला आणि पंधरा लाख रुपये कारमध्ये तुमच्यासोबत आल्याने तुम्ही असाल तेथेच थांबा असे सांगितले. तेव्हा पाटणी हे केम्ब्रिज शाळेसमोरील चौकात होते. पाटणी यांनी रस्त्याच्या बाजूला कार उभी केली आणि कारमधील पैशाचे पाकीट बाहेर काढून कारच्या टपावर ठेवून भावाची प्रतीक्षा करू लागले. तेव्हा त्यांच्या भावाने पुन्हा फोन करून तुम्ही विमानतळापर्यंत या, मी इकडून येतो, असे सांगितले. त्यामुळे पाटणी हे बोलतच कारमध्ये बसले आणि केम्ब्रिज चौकातून वळून ते पुन्हा चिकलठाणा विमानतळाकडे निघाले. कारच्या टपावर ठेवलेले पैशाचे पाकीट खाली पडले. शहराकडून जालन्याकडे जाणाऱ्या काळी-पिवळी जीपचालकाला हे पाकीट पडलेले दिसले. त्याने पाकीट उचलले. तेव्हा एक जण पळत त्यांच्याजवळ आला आणि ते पाकीट माझे आहे, असे म्हणाला. त्यामुळे काळी-पिवळी जीपचालकाने पैशाचे पाकीट त्या व्यक्तीला दिले. तो माणूस झाल्टा फाट्याकडे जाणाºया रिक्षामध्ये बसून गेला. दरम्यान पाटणी यांना पैशाचे पाकीट टपावरच विसरल्याचे लक्षात आल्याने ते लगेच पुन्हा वळण घेऊन केम्ब्रिज चौकात आले. ते पाकीट एक जण घेऊन गेल्याचे समजले. या घटनेची माहिती पाटणी यांनी लगेच एमआयडीसी सिडको पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शेख अफरोज, सपोनि. सत्यजित ताईतवाले यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: It is said ... 15 lakh rupees lying on the car, and somebody ran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.