कॅशलेस व्यवहाराचा उलटा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:45 AM2017-11-08T00:45:13+5:302017-11-08T00:45:20+5:30

नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठा गाजावाजा करुन कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यात आली़ सुरुवातीचे तीन महिने नोटा टंचाईमुळे नाईलाजाने का होईना कॅशलेसच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती़ आता नोटाबंदीची वर्षपूर्ती होत असताना चलनात पुरेशा प्रमाणात असलेल्या नोटांमुळे नांदेडकर पुन्हा रोकडरहित व्यवहारांकडे वळले आहेत़ त्यामुळे कॅशलेसचा उलटा प्रवास सुरु झाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़

Inversion of cashless transaction | कॅशलेस व्यवहाराचा उलटा प्रवास

कॅशलेस व्यवहाराचा उलटा प्रवास

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठा गाजावाजा करुन कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यात आली़ सुरुवातीचे तीन महिने नोटा टंचाईमुळे नाईलाजाने का होईना कॅशलेसच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती़ आता नोटाबंदीची वर्षपूर्ती होत असताना चलनात पुरेशा प्रमाणात असलेल्या नोटांमुळे नांदेडकर पुन्हा रोकडरहित व्यवहारांकडे वळले आहेत़ त्यामुळे कॅशलेसचा उलटा प्रवास सुरु झाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़
मोदी सरकारने ८ नोव्हेंबरला रात्री नोटाबंदीची घोषणा केली़ त्यानंतर दुसºया दिवसापासून बँक, पोस्ट कार्यालयात जुन्या नोटा जमा करण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बँकांमध्ये भरल्या. शंभर आणि पन्नासच्या नोटा त्यावेळी मोठ्या प्रमाणात चलनात होत्या़ जवळपास दीड ते दोन महिने नागरिकांना आपल्याकडील जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठीच धडपडावे लागले़ त्यानंतर भरलेले पैसे काढण्यावरही अनेक निर्बंध टाकण्यात आले़ त्यामुळे चार ते पाच महिने नोटाबंदीचा हा घोळ सुरुच होता़ चलनटंचाईमुळे सरकारने कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केले़ त्यासाठी तयारीही केली होती़
नांदेडकरांनीही चलनटंचाईवर पर्याय म्हणून सुरुवातीचे दोन ते तीन महिने कॅशलेस व्यवहारावर भर दिला़ त्यावेळी नांदेडातील बाजारपेठेत जवळपास ४० ते ५० टक्के व्यवहार हे कॅशलेसद्वारे होत होते़ विशेष म्हणजे, त्यावेळी कॅशलेस व्यवहारावर सवलतही देण्यात येत होती़ तीन महिन्यानंतर या व्यवहारावरील सवलती बंद झाल्या़ बँकांही कॅशलेस व्यवहारावर अतिरिक्त शुल्क आकारु लागल्या़ त्यात आता चलनही पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले़ त्यामुळे नांदेडकर पुन्हा रोकडरहित व्यवहाराकडे वळले़ आजघडीला बाजारपेठेत जेमतेम १० ते १५ टक्के कॅशलेस व्यवहार होत आहेत़ त्यामुळे कॅशलेस व्यवहाराचा नांदेडमध्ये उलटा प्रवास सुरु असल्याचे दिसत आहे़

Web Title: Inversion of cashless transaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.