शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती अप्राप्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:45 PM2017-08-16T23:45:55+5:302017-08-16T23:45:55+5:30

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत. अंदाजपत्रक व कार्ययोजना अंदाजपत्रक २०१७-१८ नुसार ७३९ शाळाबाह्य मुले-मुली असल्याचे निदर्शनास आले. सदर विद्यार्थ्यांची माहिती संबधित गशिअ यांनी जिल्हा कार्यालयाकडे देणे बंधनकारक होते. मात्र अद्याप शाळाबाह्य मुलांची माहिती सरल प्रणालीत भरली आहे किंवा नाही, याबाबत संभ्रम आहे.

Information about out-of-school students is unrecoverable | शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती अप्राप्तच

शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती अप्राप्तच

googlenewsNext

हिंगोली : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत. अंदाजपत्रक व कार्ययोजना अंदाजपत्रक २०१७-१८ नुसार ७३९ शाळाबाह्य मुले-मुली असल्याचे निदर्शनास आले. सदर विद्यार्थ्यांची माहिती संबधित गशिअ यांनी जिल्हा कार्यालयाकडे देणे बंधनकारक होते. मात्र अद्याप शाळाबाह्य मुलांची माहिती सरल प्रणालीत भरली आहे किंवा नाही, याबाबत संभ्रम आहे.
शिक्षण विभागातर्फे २०१७-१८ मध्ये शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षण दरम्यान कधीच शाळेत न येणारे, कामामुळे शिक्षण घेता येत नसलेले तसेच मध्येच शाळा सोडून गेलेले ७३९ विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला. या मुलांना संबधित गट शिक्षणाधिकाºयांनी जवळील शाळेत दाखल करून घेण्याच्या सूचना होत्या. शिवाय त्यांचा अहवाल शिक्षणाधिकारी यांच्याकडे देणे अनिवार्य होते. परंतु एकाही तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाºयांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सद्यस्थितीबाबत अद्याप यादी शिक्षण विभागाकडे आणून दिली नाही. किंंवा शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत आहेत किंवा नाहीत, याची माहिती उपलब्ध नाही. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन सदर माहिती सादर करण्याच्या सूचना सर्व गट शिक्षणाधिकाºयांना देण्यात आल्या होत्या. याबाबतचे पत्रही शिक्षणाधिकाºयांनी २७ जुलै रोजी दिले होते. या मुलांची माहिती ३० जून अखेर देणे बंधनकारक होते. परंतु आॅगस्ट महिना उलटून गेला तरी माहिती अप्राप्तच आहे.
त्यामुळे सद्यस्थितीत किती मुले शाळेत जात आहेत, किंवा जात नाहीत, यामध्ये मात्र संभ्रम निर्माण होत आहे.

Web Title: Information about out-of-school students is unrecoverable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.