औद्योगिक अभियांत्रिकी प्रदर्शन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 12:39am

यवसाय, उद्योगातील नवीन तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या औद्योगिक आणि अभियांत्रिकी प्रदर्शनाचे उद्घाटन रेल्वेस्टेशन रोडवरील अयोध्यानगरी मैदानावर शुक्रवारी झाले

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : व्यवसाय, उद्योगातील नवीन तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या औद्योगिक आणि अभियांत्रिकी प्रदर्शनाचे उद्घाटन रेल्वेस्टेशन रोडवरील अयोध्यानगरी मैदानावर शुक्रवारी झाले. इंदोर येथील इन्फोलाइन, जैन इंजिनिअर्स सोसायटी आणि मराठवाडा आॅटो क्लस्टरच्या विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. रविवारी (दि.१२) पर्यंत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले असणार आहे. तीनदिवसीय औद्यगिक व अभियांत्रिकी प्रदर्शनाचे उद्घाटन शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी संयोजक असलेले इन्फोलाइनचे संचालक आर. के. अग्रवाल, जैन इंजिनिअर्स सोसायटीचे अध्यक्ष आनंद मिश्रीकोटकर, सचिव दर्शन संचेती, रूपेश ठोळे, भरत गंगाखेडकर, दिनेश गंगवाल, मोतीलाल पाटणी, महावीर सेठी, नितीन बोरा, सुनील सेठी, राजेश पाटणी, कमल पहाडे, भरत जैन, सचिन सोनटक्के, पृथ्वीराज शहा, इंद्रजित शहा, राजेश लोढा, सुशील गंगवाल, शिरीष खंडारे, आनंद चोरडिया, संदीप भंडारी, सावन चुडीवाल आदी उपस्थित होते. इन्फोलाइनतर्फे यापूर्वी नागपूर, नाशिक, रायपूर, इंदोर, हैदराबाद, कोइमतूर, जमशेदपूर आदी ठिकाणी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. व्यावसायिकांना सकाळी ११ ते २ वाजेदरम्यान आणि नागरिकांसाठी सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन बघता येणार आहे. प्रदर्शनात १२५ पेक्षा अधिक प्रसिद्ध कंपन्या सहभागी झाल्या आहेत. यात इंडस्ट्रीयल आॅटोमेशन, मशीन टूल्स, बेअरिंग, स्विच गीअर्स, पंप वेल्डिंग उपकरणे, फार्मा मशिनरी, पावर टूल्स, कटिंग टूल्स, बांधकाम उपकरणे याच्यासह इतरही वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन संयोजक राजकुमार अग्रवाल यांनी केले आहे.

संबंधित

अवैध वाळू वाहतुकीत अडकला खासदारांचा ताफा; प्रशासनाने तत्परतेने केली १४ वाहनांवर कारवाई   
उदगीरमध्ये अतिक्रमण हटविण्यासाठी व्यापा-यांनी पुकारला बेमुदत बंद
माजलगावात उस दराबाबत शेतकरी आक्रमक; राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ धरला रोखून 
तोतया लाईनमने वृद्ध महिलेच्या घरातून पळविले अडीज लाखाचे दागिने
परभणीत साडे सात लाखाची चोरी; कुलुपबंद घरात खिडकीचे गज वाकवत केला प्रवेश

औरंगाबाद कडून आणखी

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द
एमजीएम टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून
राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या अभय शिंदेचा गोल्डन धमाका
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादच्या राधिका, मोहित, स्वरूपा यांना सुवर्ण
वैज्ञानिक प्रयोगांची ‘इन्स्पायर’मध्ये धमाल

आणखी वाचा