महावीर जन्मोत्सव समिती कार्यालयाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:00 AM2018-03-19T01:00:14+5:302018-03-19T13:07:18+5:30

आचार्य देवेंद्रसागर सुरीश्वर म. सा. यांच्या उपस्थितीत रविवारी भगवान महावीर जन्मोत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

 Inauguration of Mahavir Janmotsav committiee Office | महावीर जन्मोत्सव समिती कार्यालयाचे उद्घाटन

महावीर जन्मोत्सव समिती कार्यालयाचे उद्घाटन

googlenewsNext

औरंगाबाद : आचार्य देवेंद्रसागर सुरीश्वर म. सा. यांच्या उपस्थितीत रविवारी भगवान महावीर जन्मोत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. खाराकुंवा येथील पोरवाल भवन येथे कार्यालयाचे उद्घाटन सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थितांनी ‘भगवान महावीर की जय’ असा जयघोष केला. आचार्यजींच्या उपस्थितीने सर्वांचा उत्साह द्विगुणित झाला होता.

यावेळी सकल जैन समाजाचे महासचिव महावीर पाटणी, कोषाध्यक्ष जी. एम. बोथरा, तसेच प्रशांत देसरडा, यंदाच्या समितीचे अध्यक्ष विनोद बोकडिया, कार्याध्यक्ष मुकेश साहुजी, भारती बागरेचा, कोषाध्यक्ष रमेश घोडके, मिठालाल कांकरिया, भावना सेठीया आदींची प्रमुख उपस्थिती होती. महावीर जयंतीनिमित्त समितीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून राजेंद्र दर्डा म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही महावीर जयंतीची मिरवणूक २९ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता काढण्यात यावी, तसेच समाजबांधवांनी शिस्तीचे व भक्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.

विनोद बोकडिया व मुकेश साहुजी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. श्रावणबेळगोळ येथे १० हजार डॉक्टरांच्या मेळाव्याचे यशस्वी नेतृत्व करणारे डॉ. सन्मती ठोले यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. महावीर पाटणी यांनी प्रास्ताविक केले. अनिल संचेती यांनी सूत्रसंचालन केले तर नीलेश पहाडे यांनी आभार मानले. यावेळी समितीच्या करुणा साहुजी, राजेश मुथा तसेच ललित पाटणी, मदनलाल आच्छा, चांदमल सुराणा, अ‍ॅड. डी. बी. कासलीवाल, डॉ. प्रकाश झांबड, संजय संचेती, सुधीर साहुजी, दिगंबरराव क्षीरसागर, वृषभ कासलीवाल, रवी मुगदिया, विलास साहुजी, दिलीप मुगदिया, प्रकाश कासलीवाल, विजय देसरडा, ताराचंद बाफना, रवी लोढा, महिला समितीच्या अध्यक्षा मंगला पारख, मधू जैन, मंगला गोसावी, मंजू पाटणी यांच्यासह समाजातील श्रावक-श्राविका उपस्थित होत्या.

Web Title:  Inauguration of Mahavir Janmotsav committiee Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.