मराठवाड्यातील रस्त्यांबाबत महत्त्वाचे निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 01:04 AM2017-07-26T01:04:34+5:302017-07-26T01:04:34+5:30

केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर २०१५ मध्ये मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या १८ हजार कोटींच्या ‘प्लॅन’बाबत मंगळवारी दिल्लीत संसदीय समितीची एक महत्त्वाची बैठक झाली.

Important decisions regarding roads in Marathwada | मराठवाड्यातील रस्त्यांबाबत महत्त्वाचे निर्णय

मराठवाड्यातील रस्त्यांबाबत महत्त्वाचे निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्दे३० जुलै रोजी औट्रम घाटाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर २०१५ मध्ये मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या १८ हजार कोटींच्या ‘प्लॅन’बाबत मंगळवारी दिल्लीत संसदीय समितीची एक महत्त्वाची बैठक झाली. २६ जुलै रोजी दुपारी गडकरी यांची भेट घेऊन काही महत्त्वपूर्ण निर्र्णय होतील. मंगळवारी झालेल्या या बैठकीला खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे चेअरमन दीपककुमार, बी.ओ. तावडे, अतुलकुमार, एम. चंद्रशेखर, आशिष असदी, मराठवाडा प्रकल्प प्रमुखांची उपस्थिती होती.
खा. खैरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ३० जुलै रोजी औट्रम घाटाची पाहणी फॉरेस्ट अधिकाºयांना घेऊन केली जाईल. त्यानंतर औट्रम घाटाला वनविभागाची परवानगी मिळू शकेल. औरंगाबाद ते अजिंठा हा रस्ता चौपदरी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एनएच क्रमांक २११ चे काम ६५ टक्के झाले आहे. निपाणी ते वाल्मीमार्गे करोडी ते कन्नड हे काम डिसेंबरपर्यंत सुरू होईल, असे दीपककुमार यांनी आश्वासित केले आहे. जालना रोड, बीड बायपास रुंदीकरणाची कामे मराठवाडा विभागाकडे आहेत, तसेच औरंगाबाद ते पैठण या रस्त्याचा भारतमाला योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्याबाबत बुधवारी चर्चा होणार आहे.

Web Title: Important decisions regarding roads in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.