निवडणुकीच्या रणधुमाळीत दुष्काळाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:30 PM2019-04-16T23:30:24+5:302019-04-16T23:31:03+5:30

निवडणुकीच्या रणधुमाळीत विभागातील भीषण दुष्काळाचा धुराळा उडाला आहे. टंचाईच्या झळांकडे राजकीय नेत्यांसह प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याची ओरड सुरू झाली आहे.

Ignoring the drought in election rush | निवडणुकीच्या रणधुमाळीत दुष्काळाकडे दुर्लक्ष

निवडणुकीच्या रणधुमाळीत दुष्काळाकडे दुर्लक्ष

googlenewsNext
ठळक मुद्दे२९० लघु प्रकल्प कोरडे : टंचाईच्या झळा, चारा छावणीत पावणेचार लाख जनावरे

औरंगाबाद : निवडणुकीच्या रणधुमाळीत विभागातील भीषण दुष्काळाचा धुराळा उडाला आहे. टंचाईच्या झळांकडे राजकीय नेत्यांसह प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याची ओरड सुरू झाली आहे. विभागातील जलसाठ्यांतील पिण्याचे पाणी जोत्याखाली गेले असून, ४ टक्के पाणी सर्व प्रकल्पांत शिल्लक राहिले आहे. ३५ लाख नागरिकांना २,२०० हून अधिक टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. विभागाची ही भीषणता राजकीय धावपळ आणि प्रशासनाच्या कोंडीत अडकली आहे.
मराठवाड्यात सर्व मिळून ६७ लाख जनावरे आहेत. त्यात ३६ लाख २५ हजार ४९० मोठी, ११ लाख ३६ हजार लहान जनावरे, शेळ्या, मेंढ्यांची संख्या १९ लाख ४५ हजार ७२८ आहे. विभागात दररोज २६ हजार ३३० टन चारा लागतो. औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत सुरू करण्यात आलेल्या ६०५ चारा छावण्यांमध्ये जनावरांची संख्या आता ३ लाख ७५ हजार ६५७ झाली आहे. यंदा दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात जानेवारी महिन्यापासूनच चाराटंचाई होती. सर्वाधिक चाराटंचाई बीड जिल्ह्यात असून, ५६२ चारा छावण्यांत ३ लाख १९ हजार ९७२ मोठी, तर २८ हजार ७२ मोठी जनावरे आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ छावण्यांत २३ हजार ६४८ मोठी, तर २ हजार ८९२ लहान, अशी एकूण २६ हजार ५४० जनावरे आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात चारा छावण्या उशिराने सुरू झाल्या असून, एका छावणीमध्ये ८६४ मोठी, तर २०९ लहान, अशी १ हजार ३ जणावरांच्या चारा- पाण्याची सोय करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात ८७२, उस्मानाबाद जिल्ह्यात ६१, तर औरंगाबाद जिल्ह्यात एका चारा छावणीला मंजुरी देण्यात आली आहे.
एका महिन्यात १६ प्रकल्प झाले कोरडे
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ३० कोरडे पडले आहेत. ३१ प्रकल्प जोत्याखाली आहेत, तर ११ प्रकल्पांत २५ टक्के पाणी आहे. ७४९ लघु प्रकल्पांपैकी २९० कोरडे पडले आहेत. १ महिन्यात १६ प्रकल्प कोरडे पडले आहेत. गेल्या महिन्यात २६४ प्रकल्प कोरडे होते. ३०७ प्रकल्प जोत्याखाली असून, ११३ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. विभागातील एकूण ८७२ प्रकल्पांत ४ टक्के पाणी शिल्लक आहे.

Web Title: Ignoring the drought in election rush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.